राम नवमीच्या दिवशी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचं एक नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण त्यावर अनेक लोकांनी आक्षेप घेतला. बऱ्याच लोकांनी पोस्टरमधील चुका निदर्शनास आणून दिल्या. टीझरमुळे वादात अडकलेला चित्रपट ‘आदिपुरुष’ पोस्टरनंतरही चांगलाच वादात अडकला. या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून नेटकरी यावर संताप व्यक्त करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता नुकतंच हनुमान जयंतीनिमित्त या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या देवदत्त नागेचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. देवदत्त नागेचा हा लूक पाहून बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या तर काही लोकांनी देवदत्त नागेच्या मेहनतीची दखल घेत त्याची प्रशंसा केली. हनुमान जयंतीचं निमित्त साधून याच चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनीही हैद्राबादच्या करमन घाट येथील हनुमान मंदिरात जाऊन हनुमंताचे दर्शन घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

आणखी वाचा : केवळ अभिनेतेच नव्हे तर ‘या’ गायकांनीही लपवलं त्यांचं खरं नाव; आजही करतात करोडो रसिकांच्या मनावर राज्य

ओम राऊत यांचे हे फोटो या चित्रपटाची निर्मिती कंपनी ‘टी सीरिज’ने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये ओम राऊत हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ‘आदिपुरुष’ या चित्रपटाच्या यशासाठी ओम राऊत यांनी बजरंग बलीचे आशीर्वाद घेतले आहेत.

‘आदिपुरुष’ चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नकारात्मक चर्चेत आला. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉयकॉट आदिपुरुष’ या ट्रेंडचा त्याला सामना करावा लागला. तसेच सैफ, प्रभासची या चित्रपटामधील भूमिका प्रेक्षकांना फारशी पटलेली नाही. रावणाच्या भूमिकेमधील सैफला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. आता नव्या पोस्टर्समधून या चित्रपटात काही बदल करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. हा चित्रपट १६ जून २०२३ ला संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush director om raut visits karnaghat hanuman temple occasion hanuman jayanti avn