ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटावर सर्वत्र टीका करण्यात आली. या चित्रपटाचे व्हीएफएक्स, कलाकारांची कामं प्रेक्षकांना खटकलीच पण त्याचबरोबर या चित्रपटातील संवाद ऐकून प्रेक्षक चांगलेच भडकले. तर आता या चित्रपटाच्या संवादांबद्दल या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्यानेच भाष्य करत त्यालाही या चित्रपटाचे संवाद पटले नसल्याचा खुलासा केला आहे.

या चित्रपटाच्या संवादांवरून गेले काही दिवस चांगलाच वाद रंगला. अखेरीस या चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकांनी माघार घेत या चित्रपटाच्या संवादांमध्ये बदल केला. आधी “कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, तो जलेगी भी तेरे बाप की” हा संवाद हनुमान म्हणताना दिसत आहेत, तर अशोक वाटिकेत हनुमान जेव्हा सीता मातेला भेटायला येतात तेव्हा तेथील एक राक्षस सैनिक त्यांना उद्देशून म्हणतो, “तेरी बुआ का बगीचा है क्या जो हवा खाने आ गया?”, तर या व्यतिरिक्त “जो हमारी बहनों को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगा देंगे,” अशा काही संवादांवर सर्वत्र आक्षेप नोंदवण्यात आला. तर हे संवाद या चित्रपटामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारलेला अभिनेता लवी पजनी यालाही खटकले.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Maharashtrachi Hasyajatra fame prasad khandekar Namrata sambherao shivali parab onkar raut new drama thet tumchya gharatun coming soon
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर; नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकरसह दिसतील ‘हे’ कलाकार

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

‘आज तक’ला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “हे संवाद ऐकल्यावर सर्वांप्रमाणेच माझाही संताप झाला कारण मीही हिंदू आहे. परंतु दिग्दर्शक तुम्हाला जे सांगतो ते तुम्हाला करावं लागतं. कारण तुम्ही त्यांच्याशी करार केलेला असतो. चित्रपटाचे चित्रीकरण होताना ते वेगवेगळ्या भागांमध्ये होतं. त्यामुळे तेव्हा कोणालाच माहीत नसतं की मोठ्या पडद्यावर नक्की काय दिसणार आहे आणि नंतर याचा स्क्रीनप्ले काय असणार आहे.” आता त्याचं हे बोलणं चांगलंच चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’ पाहावा म्हणून क्रिती सेनॉनची धडपड, आता शालेय विद्यार्थ्यांना दाखवणार हा चित्रपट

लवीच्या या बोलण्यावरून या चित्रपटातील कलाकारही नाखुश असल्याचं चित्र आता दिसत आहे. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असून संवाद बदलल्यावरही प्रेक्षक हा चित्रपट पाहायला चित्रपटगृहात जात नाहीयेत.

Story img Loader