ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेता प्रभास परदेशी निघून गेल्याचं समोर आलं आहे.

‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीरामांची भूमिका साकारली आहे, अभिनेत्री क्रिती सेनोन ही सीतेच्या भूमिकेत दिसत आहे, तर हनुमानाची भूमिका मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने केली आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच भारतात १०० हून अधिक कोटींची कमाई केली. परंतु या चित्रपटावर प्रेक्षक जोरदार टीका करत आहेत.

आणखी वाचा : कलाकारांना तगडी फी, व्हीएफएक्सवर मोठा खर्च; ‘आदिपुरुष’चं बजेट माहितेय का? आकडा वाचून व्हाल आवाक्

गेले अनेक दिवस या चित्रपटाची संपूर्ण टीम या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दिग्दर्शक ओम राऊत, अभिनेत्री क्रिती सेनॉन चाहत्यांसमोर आले. मात्र या सगळ्यांमध्ये या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास कुठेच दिसला नाही. तर ‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच प्रभास अमेरिकेला गेला आहे. एक आठवडा तो अमेरिकेमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेणार आहे आणि तिथून आल्यावर तो त्याच्या आगामी ‘सलार’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.

हेही वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

दरम्यान, या चित्रपटांच्या व्हीएफएक्सवर, संवादांवर, कथेवर, कलाकारांच्या अभिनयावर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. “हा चित्रपट आवडला नाही”, “हा चित्रपट कौतुकास अजिबात पात्र नाही”, “चित्रपटासाठी वापरलेले ७०० कोटी पाण्यात गेले”, असं म्हणत या चित्रपटाला आणि चित्रपटाच्या टीमला ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे आता परदेशातून परतल्यावर या चित्रपटावर आणि चित्रपटावर होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रभासची प्रतिक्रिया काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Story img Loader