दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर आज (१६ जून ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. अनेक वाद आणि बदलांनंतर अखेर त्यांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये या चित्रपटाचे पहाटे ४ वाजताचे शो विकले गेले आहेत.
चाहते ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रभासचे पुनरागमन साजरे करत आहेत. पहाटेचे शो पाहिलेल्या चाहत्यांनी ट्विटरवर या चित्रपटाचे रिव्ह्यू दिले आहेत. त्यांनी चित्रपटाला आधुनिक रामायण म्हटलं असून प्रभासच्या अभिनयाचं ते खूप कौतुक करत आहेत. अनेकांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाला जज करण्यापेक्षा त्याचं कौतुक करायला हवं, असंही म्हटलं आहे. एकूणच चाहत्यांच्या प्रतिक्रिया बघता त्यांना प्रभासचा हा चित्रपट आवडल्याचं दिसतंय.
चित्रपटाबद्दल ट्विटर युजर्सच्या प्रतिक्रिया –
काही युजर्सच्या मते, आदिपुरुष ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. तर, प्रभासच्या लूकला ट्रोल करणाऱ्यांनाही चाहत्यांनी उत्तर दिलं आहे.
दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडमध्ये टू डी आणि थ्रीडी मध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम, क्रिती सेनॉन सीता आणि सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहेत. यामध्ये सनी सिंगने लक्ष्मणाची तर देवदत्त नागेने हनुमानाची भूमिका साकारली आहे.