‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून सोशल मीडियावर बरेच वाद निर्माण झाले होते. चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली मात्र, त्यानंतर ‘आदिपुरुष’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट झाली.

हेही वाचा : “‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यावर माझी आई रडली अन् आदेश…” सुचित्रा बांदेकरांनी सांगितली नवऱ्याची पहिली प्रतिक्रिया

Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
navneet rana daryapur rada
VIDEO : अमरावतीत नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा; माजी खासदारावर हल्ल्याचा प्रयत्न!
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
celebrated Diwali in America for the first time watch video
Video: भाऊ कदम यांच्या लेकीने पहिल्यांदाच कुटुंबापासून दूर राहून अमेरिकेत ‘अशी’ साजरी केली दिवाळी, पाहा व्हिडीओ

‘आदिपुरुष’ चित्रपट देशभरात तसेच सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादमुळे आधी पायरसी वेबसाइट्स आणि आता युट्यूबवर लीक झाला. माहितीनुसार, चित्रपटाची लिंक शनिवारी युट्यूबवर एचडी क्वालिटीमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. ‘आदिपुरुष’ लीक झाल्यावर या युट्यूबच्या लिंकवर काही तासातच जवळपास २.३ मिलियन (२० लाखांहून अधिक) युजर्सनी हा चित्रपट पाहिला. मात्र, त्यानंतर काही वेळातच ही लिंक बंद करण्यात आली तसेच चित्रपट आता युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे.

हेही वाचा : Bawaal Trailer : “प्रेम, हिटलरचे शहर अन् दुसरे महायुद्ध…”, वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या ‘बवाल’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

चित्रपट लीक होण्यापूर्वी ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांनी शनिवारीच समस्त जनतेची वादग्रस्त संवादांसाठी माफी मागितली होती. “भगवान हनुमानाचे आशीर्वाद सदैव आपल्याबरोबर आहेत. देव आपल्याला पवित्र सनातन आणि आपल्या महान देशाची सेवा करण्याचे सामर्थ्य देवो” असे ट्वीट मुंतशीर यांनी केले होते.

हेही वाचा : सुपरहिट ठरलेल्या ‘जब वी मेट’ चित्रपटाचे नाव कोणी सुचवले? शाहिद कपूरने केला खुलासा; म्हणाला, “३ नावांमध्ये आम्ही…”

दरम्यान, १६ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने सुद्धा चित्रपटाच्या टीमविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.