ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका हिंदू संघटनेने ‘आदिपुरुष’बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटात ‘रामायण’, ‘भगवान श्रीराम’ आणि हिंदू संस्कृतीची खिल्ली उडवली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. चित्रपटाला सोशल मीडियावरुनही प्रचंड विरोध होत आहे. प्रेक्षकांनी त्यांचा राग या माध्यमातून व्यक्त केला आहे. इतकंच नव्हे तर IMDb या वेबसाइटवरही या चित्रपटाला सर्वात कमी रेटिंग मिळालं आहे.

आणखी वाचा : “आदिपुरुषसारख्या चित्रपटांमुळेच…” प्रसिद्ध समीक्षक तरण आदर्श यांनी बॉलिवूडला सुनावले खडेबोल

ज्या वेबसाईटवर जगभरातील वेगवेगळ्या चित्रपट अन् वेब सीरिजना रेटिंग दिलं जातं अशा ‘IMDb’ साईटवर आदिपरूषचं रेटिंग हे १० पैकी २.७ असे दिसत आहे. याबरोबरच याच्या रिव्यू सेक्शनमध्ये लोकांनी या चित्रपटावर प्रचंड टीका केली आहे. सामान्य व्यक्तीही या साईटवर त्यांचं मत मांडू शकते. भारतातील बऱ्याच फ्लॉप चित्रपटांना मिळालेल्या रेटिंगपेक्षाही कमी रेटिंग ‘आदिपुरुष’ला मिळालं आहे.

adipurushreview2
adipurushreview

समीक्षक सिनेतज्ञ, यांच्यापासून अगदी सामान्य लोकांचीही हा चित्रपट पाहून निराशा झाली आहे. ५०० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९० कोटींचा व्यवसाय केल्याचं सांगितलं जात आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. प्रभासने या चित्रपटात श्रीराम तर क्रिती सेनॉनने सीतामातेची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने हनुमान तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणखेच्या भूमिकेत आहेत.