मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत यांच्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार आहे. ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या गाण्यातून श्रीरामाच्या भक्तीचा जागर करण्यात येत असून रिलीज झाल्यावर या गाण्याने नवा रेकॉर्ड केला आहे.

हेही वाचा : “चित्रपटगृहांच्या मालकांना धमक्यांचे फोन…” ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शाहांचा मोठा दावा, म्हणाले “बेकायदेशीर बंदी…”

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Family recreate iconic Hum Aapke Hain Koun scene
‘गाने बैठे गाना, सामने…’ कुटुंबातील सदस्यांनी ‘हम आपके है कौन’मधील ‘ते’ गाणं केलं रिक्रिएट; VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
upendra limaye first telugu film director praises him
उपेंद्र लिमयेंचा पहिला तेलुगू चित्रपट! थेट दाक्षिणात्य दिग्दर्शकाकडून कौतुक; म्हणाला, “सर कोणतीही भूमिका…”
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

‘जय श्री राम राजा राम’ या ‘आदिपुरुष’ चित्रपटातील पहिल्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. हे गाणे अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्याचे गीतकार मनोज शुक्ला आहेत. ‘जय श्री राम’ या गाण्याच्या व्हिडीओला रिलीज झाल्यापासून अवघ्या २४ तासांमध्ये सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ एका दिवसात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ बनला आहे. आकडेवारीनुसार, ‘आदिपुरुष’च्या पहिल्या गाण्याला २ करोड ६२ लाख ९१ हजार २३७ व्ह्यूज आणि ४ लाख ८४ हजार १८६ लाईक्स मिळाले आहेत. हा नवा रेकॉर्ड करीत ‘आदिपुरुष’ने अक्षय कुमारच्या ‘क्या लोग तुम’ या गाण्याला मागे टाकले आहे.

हेही वाचा : सैफच्या लेकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, सारा अली खान खुलासा करीत म्हणाली…

मुंबईमध्ये अनोख्या पद्धतीने पहिले गाणे रिलीज करता यावे यासाठी ‘आदिपुरुष’च्या टीमने विशेष तयारी केली होती. अजय-अतुल यांच्यासह ३० जणांच्या कोरस टीमने लाइव्ह परफॉर्म केल्यावर हे गाणे लॉंच करण्यात आले. दिग्दर्शक ओम राऊत, भूषण कुमार यांच्याबरोबर अजय-अतुल यांनी मोठ्या भक्तिभावाने ‘जय श्री राम’ गाणे बनवले आहे, असे या कार्यक्रमादरम्यान सांगण्यात आले.

दरम्यान, ‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसेल. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. १६ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader