ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, कृती सेनॉन व सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. रामनवमीच्या मुहुर्तावर चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी चित्रपटातील हनुमानाचा लूक समोर आला होता. आता ‘आदिपुरुषम’धील सीतामातेचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनॉन सीता ही भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये कृती सीतामातेच्या वेशात दिसत आहे. भगव्या रंगाची साडी तिने परिधान केली आहे. तिचे डोळेही थोडे पाणावलेले दिसत आहेत. ‘आदिपुरुष’मधील सीतामातेच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा>>शाहीर साबळेंच्या पत्नींबरोबर ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने शेअर केला फोटो, म्हणाली, “मी…”
‘आदिपुरुष’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सीतामातेच्या भांगेत कुंकूत नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या पोस्टरमध्ये ही चूक सुधारण्यात आली आहे. सीतामातेच्या भूमिकेत असलेल्या कृतीच्या भांगेत कुंकू असल्याचं पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा>> आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना स्वरा भास्करचा पाठिंबा, ट्वीट करत म्हणाली, “बलात्काऱ्यांना…”
‘आदिपुरुष’ चित्रपट येत्या १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास श्रीराम ही भूमिका साकारताना दिसणार आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे.