बहुचर्चित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या प्रेक्षक प्रतीक्षेत होते. पहिल्याच दिवशी चित्रपटाचे शो हाऊसफूल झालेले पाहायला मिळाले. परंतु, हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नसल्याचं चित्र आहे. ‘आदिपुरुष’ला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील अनेक क्लिप्स व मीम्स व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका नेटकऱ्याने ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत केलेलं एक ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटमध्ये नेटकऱ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ‘आदिपुरुष’ चित्रपटातील वानराशी तुलना केली आहे. एकनाथ शिंदे व चित्रपटातील वानराचा फोटो त्याने ट्विटरवर शेअर केला आहे. “एकनाथ शिंदे ‘आदिपुरुष’मध्ये आहेत का? माहीत नाही”, असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> ‘जलेगी तेरे बाप की…’, हनुमानाच्या डायलॉगला प्रेम सागर यांनी म्हटलं ‘टपोरी’, म्हणाले, “ओम राऊतने ‘आदिपुरुष’ला…”

मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या या ट्वीटची ठाणे पोलिसांनी दखल घेतली आहे. नेटकऱ्याच्या या ट्वीटवर ठाणे पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन रिप्लाय करण्यात आला आहे. “तुझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर कर” असं ठाणे पोलिसांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.

या ट्वीटवर कमेंट करत अनेकांनी त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा>> Adipurush : ५०० कोटींचं बजेट असलेला ‘आदिपुरुष’ प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाइन झाला लीक, चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होणार का?

दरम्यान, ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान मुख्य भूमिकेत असलेल्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटावर टीका केली जात आहे. असं असतानाही या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९५ ते ९८ कोटींची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush netizen compare cm eknath shinde with monkey in movie thane police reply on tweet kak