‘आदिपुरुष’ चित्रपटाबद्दलचा वाद दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाविरोधात काही ठिकाणी तक्रारी देण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी तोडफोडही झाली. अशातच पालघर जिल्ह्यातील नालासोपारा इथे एका थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले. काही हिंदू संघटनांनी चित्रपटाचे शो बंद पाडले व गोंधळ घातला. थिएटरमधील या संपूर्ण गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Adipurush Box Office Collection: ‘आदिपुरुष’ चित्रपटाने तिसऱ्या दिवशी किती कमाई केली? आकडेवारी आली समोर

पालघरच्या नालासोपारा येथील एका मल्टिप्लेक्समध्ये रविवार १८ जून रोजी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा शो सुरू होता. त्याचवेळी काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी गोंधळ घातला. आंदोलकांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवले, घोषणाबाजी केली आणि मल्टिप्लेक्स कर्मचाऱ्यांशी चांगलाच वाद घातला. या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आला आहे.

‘आदिपुरुष’मधील ‘त्या’ दाव्यावर नेपाळची नाराजी, भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर घातली बंदी

“तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी शिकवणार का, आम्ही आमच्या देवाचा अपमान सहन करू शकत नाही. आम्ही इथेच आमचं म्हणणं मांडणार. आमच्या देवी-देवतांचा अपमान करणाऱ्यांचा आम्ही विरोध करणार. आम्हाला फासावर चढावं लागलं तर तेही करू पण अपमान सहन करणार नाही,” असं म्हणत या लोकांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी बॉलिवूडविरोधी घोषणा दिल्या.

दरम्यान, मल्टिप्लेक्समधील एक व्यक्ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण या आंदोलनकर्त्यांनी त्याचं म्हणणं न ऐकता तिथेच गोंधळ घातला. देशातील विविध भागात चित्रपटाला विरोध होत असताना आता महाराष्ट्रातही हिंदुत्त्वादी संघटना आक्रमक भूमिका घेऊ लागल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adipurush screening stopped by hindu organisations members create ruckus at multiplex in nalasopara hrc
Show comments