ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला होता. यामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान व देवदत्त नागे यांच्या मुख्य भूमिका होत्या. रिलीजच्या चित्रपट पहिल्याच दिवशी प्रभू श्रीराम, रावण व सीतेचे लूक तसेच हनुमानाच्या संवादांवरून वादात अडकला. चित्रपटातील व्हीएफएक्सवरही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती, तर अनेक ठिकाणी चित्रपटाविरोधात जनहित याचिकाही दाखल झाल्या. अशातच चित्रपटात विभीषणाचे पात्र साकारणारा अभिनेता सिद्धांत कर्णिकने या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी अपडेट; म्हणाले, “पुरावे विश्वासार्ह…”

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Zeenat Aman
‘डॉन’ नाही, तर ‘या’ चित्रपटात दिसणार होतं ‘खइके पान बनारस वाला’ गाणं पण…, झीनत अमान यांनी सांगितलेला किस्सा चर्चेत
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Adinath Kothare Manjiri Oak
“डोळ्यातून पाणी आलं…”, आदिनाथ कोठारेचे ‘पाणी’ चित्रपटासाठी कौतुक करत मंजिरी ओक म्हणाल्या, “ही तुझी पहिली फिल्म …”
Marathi Actor Jaywant Wadkar Daughter business
जयवंत वाडकर यांच्या लेकीला पाहिलंत का? झाली नामांकित कंपनीची ब्रँड अँबॅसेडर, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव

‘ई-टाइम्स’ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, सिद्धांत कर्णिकने त्याचा अनुभव शेअर केला. त्याने एका थिएटरमध्ये एका १० वर्षाच्या मुलाला आदिपुरुष बघताना नाचताना पाहिलं. सिद्धांत म्हणाला, “त्याला असं वाटत होतं की तो त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगला वेळ घालवत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट लहान मुलांनी आमची महाकाव्ये आणि कथा जवळून समजून घेण्यासाठी पाहिला पाहिजे.”

बालकलाकार साईशा भोईरच्या आईच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी तक्रारी आल्याची पोलिसांची माहिती, नेमकं प्रकरण काय?

पौराणिक कथा पॉप कल्चर फॉरमॅट वापरून सादर केल्या पाहिजेत, असे मत सिद्धांतने मांडले. “मुलांना हे माहित असलं पाहिजे की आमचे देव काल्पनिक सुपरहिरोपेक्षा जास्त कूल आहेत. मी माझ्या पुतण्यांना आणि माझ्या काही मित्रांना सुपरहिरो टी-शर्ट घातलेले पाहतो, ती स्पायडरमॅन आणि सुपरमॅन सारखी काल्पनिक पात्रे आहेत. इथे आमचा स्वतःचा इतिहास सुपरहिरो आणि पौराणिक देवांनी भरलेला आहे,” असं सिद्धांत म्हणाला.

सिद्धांत पुढे म्हणाला, “आम्हाला पॉप कल्चर चातुर्याने वापरण्याची गरज आहे जेणेकरुन आम्ही आमच्या देवांच्या कथा आमच्या मुलांच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकू, त्यांना दाखवू शकू की आमचे देव काल्पनिक सुपरहिरोपेक्षा अधिक कूल आहे. आपण पाश्चिमात्य सुपरहिरोपासून दूर राहायला हवे, असं मी अजिबात म्हणत नाही, पण आता वेळ आली आहे की आपण आपल्याच देवांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि या कथा सुपरहिरोच्या भाषेत आणण्याची आहे. कारण आजकालच्या मुलांना त्याचीच सवय आहे.”

Story img Loader