अभिनेत्री अदिती राव हैदरीने सिद्धार्थशी लग्न केलंय, अशी चर्चा होती. पण अदितीने स्वतःच एक फोटो शेअर करत या चर्चांवर मौन सोडलं आहे. अदिती व सिद्धार्थ यांनी लग्न नाही, तर साखरपुडा केला आहे. अदितीने सिद्धार्थबरोबरचा एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदिती व सिद्धार्थ यांनी बुधवारी (२७ मार्च रोजी) तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम इथं साखरपुडा केला आहे. ‘तो हो म्हणाला,’ असं कॅप्शन देत अदितीने साखरपुड्याची गुडन्यूज दिली आहे. दोघांनी लग्न केल्याचं वृत्त तेलुगू माध्यमांनी दिलं होतं. पण अदिती व सिद्धार्थ यांनी साखरपुडा केला आहे.

‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिती व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात. चंदीगडमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी सोबत हजेरी लावली होती. ते शरवानंदच्या लग्नाला एकत्र गेले होते. याशिवाय अनेकदा ते एकत्र फिरताना दिसायचे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi rao hydari and siddharth got engaged actress shared photo with ring hrc