अभिनेत्री अदिती राव हैदरी बॉलिवूडमधील सुंदर व प्रतिभाशाली अभिनेत्री आहे. तिने फक्त हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू व मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे. हिंदी चित्रपट निर्मात्यांच्या तुलनेत दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांनी अदिती राव हैदरीच्या प्रतिभेचा चांगला वापर केल्याची गेले काही दिवस चर्चा होती. त्यावर अदितीने प्रतिक्रिया दिली आहे.

Oscar 2023 मध्ये लाइव्ह सादर केलं जाणार ‘नाटू नाटू’ गाणं; अकादमीने ट्वीट करून दिली माहिती

I Want To Talk Box Office Collection
अभिषेक बच्चनच्या चित्रपटाला प्रेक्षक मिळेना; I Want To Talk सिनेमाचे ३ दिवसांचे कलेक्शन फक्त ‘इतके’
genelia deshmukh special post for her baby boy riaan
“तुझी सर्वात मोठी चिअरलीडर…”, लाडक्या लेकाच्या वाढदिवशी जिनिलीया…
Varsha Usgaonkar And Rishi Kapoor
“…माझा गैरसमज होता”, दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, “सेटवर आल्यावर ते…”
Filmmaker Mansoor Khan quit successful Bollywood career and now lives in Coonoor
सुपरहिट चित्रपट दिले अन् मुंबई सोडून ‘इथे’ निघून गेला आमिर खानचा भाऊ; आता करतोय ‘हे’ काम, म्हणाला…
Abhishek Bachchan
“जब बुरा अपनी बुराई…”, वाढत्या नकारात्मक चर्चांदरम्यान अभिषेक बच्चन काय म्हणाला?
Ananya Pandey
शाळेतील मुलांना त्रास द्यायची, बॉयफ्रेंडला फसवले, अनन्या पांडेबाबत पसरल्या होत्या अफवा; अभिनेत्री म्हणाली, “त्यामुळे मी…”
vivek oberoi buys new rolls royce car share video
विवेक ओबेरॉयने खरेदी केली आलिशान रोल्स रॉयस! वडिलांच्या हाती सोपवली नव्या गाडीची किल्ली; किंमत ऐकून थक्क व्हाल…
Aadar Jain And Alekha Advani Roka Ceremony
कपूर कुटुंबात लगीनघाई! बॉलीवूड अभिनेत्रीशी ब्रेकअप झाल्यावर करीनाचा आतेभाऊ कोणाशी करतोय लग्न? फोटो आले समोर

अदितीने तिच्या करिअरमध्ये हिंदी चित्रपटांपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जास्त काम केलं आहे. अशातच आपल्याला हिंदी चित्रपट निर्मात्यांकडून जास्त ऑफर न मिळाल्याबद्दल काळजी वाटत नाही, असं अदितीने सांगितलं. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अदितीला विचारण्यात आलं की, हिंदी चित्रपट निर्माते दक्षिणेप्रमाणे तिच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करू शकले नाहीत, असं तिला वाटतं का? त्यावर “मी हे खूपदा ऐकलं आहे,!” असं ती म्हणाली.

Video: अदिती राव हैदरी व सिद्धार्थ लग्न करणार? अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर सेलिब्रिटींच्या कमेंट्स चर्चेत

यादरम्यान, ‘ताज-डिव्हाइड बाय ब्लड’मध्ये अदितीचे सहकलाकार असलेल्या नसीरुद्दीन शाहांनीही प्रतिक्रिया दिली. “कदाचित तमिळ आणि मल्याळम निर्माते जास्त हुशार आहेत. अदितीसारख्या व्यक्तीला काळजी करण्याचं कारण नाही, लवकरच किंवा काही काळाने ते तिच्याकडे येतीलच,” असं शाह म्हणाले.

अदितीने सांगितलं की हिंदी चित्रपट निर्माते तिला दाक्षिणात्य निर्मात्यांप्रमाणे रोमांचक भूमिका देत नाहीत, पण याचा तिला फारसा फरक पडत नाही. “मी अनेक लोकांना पाहिलं आहे, ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये खरोखरच खूप चांगलं काम केलंय. जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा लहान मुलगी म्हणून माझं स्वप्न मणिरत्नम यांच्या चित्रपटातील हिरोईन बनण्याचं होतं. मला माहीत होतं की मला तमिळ बोलावं लागेल, कारण ती त्यांची भाषा आहे आणि एक तमिळ चित्रपट बनवताना त्यांना खूप आनंद होईल,” असं अदिती म्हणाली.

अकबराबद्दल शिकवलेला इतिहास मूर्खपणाचा; नसीरुद्दीन शाहांचं स्पष्ट मत

पुढे ती म्हणाली, “खरं तर मी अशा कुटुंबातून आले आहे, जिथे माझी आई, आजी सर्व उत्तम कथाकार आहेत. मोठं होताना मला समजलं की भाषा, जात, धर्म, काहीही कथेच्या आड येत नाही. कथा ही भावनांबद्दल असते आणि ती तुम्हाला एका विशिष्ट प्रकारचा अनुभव देते,” असं मत अदितीने व्यक्त केलं.