अभिनेत्री अदिती राव हैदरीने दाक्षिणात्य सिनेमांसह बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या सौंदर्य व अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अदिती उत्तम नृत्यांगनादेखील आहे. तिने आतापर्यंत हिंदी आणि साऊथमध्ये जवळपास २६ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘दिल्ली ६’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. अदिती ही राजघराण्याशी संबंधित आहे. तसेच ती आमिर खानची दुसरी पत्नी किरण रावची नातेवाईक आहे.

४ हजारांसाठी राष्ट्रपतींसमोर लालकृष्ण अडवाणींशी भांडलेले विधू विनोद चोप्रा; संतापलेले अडवाणी म्हणालेले, “तुझ्या वडिलांना…”

हैदराबादमध्ये जन्मलेल्या अदितीचं बालपण चढ-उतारांनी भरलेलं राहिलं. तिचे वडील एहसान हैदरी असून तिच्या आईचे नाव विद्या राव आहे. ती लहान असताना पालक विभक्त झाले, परिणामी बोर्डिंग स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालं. अदिती मोहम्मद साहेल अकबर हैदरी यांची पणती आहे, ते हैदराबादचे निझाम होते. तर, तिच्या आईचे बाबा जे रामेश्वर राव हे तेलंगणातील वनापर्थीचे राजा होते. आज आपण अदिती राव हैदरीच्या आयुष्यातील काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरी चोरी, घरकाम करणाऱ्या महिलेने लांबवला लाखोंचा ऐवज; चोरीची पद्धत वाचून चक्रावून जाल

लहानपणीच झाला पालकांचा घटस्फोट

अदिती राव हैदरीला लहान वयातच तिच्या आई-वडिलांच्या घटस्फोटाचा त्रास सहन करावा लागला. ती फक्त दोन वर्षांची होती तेव्हा तिचे पालक वेगळे झाले. ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक होती. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर ती दिल्लीत आली. तिचा ताबा आईकडे होता, त्यामुळे तिला वडिलांचे प्रेम मिळाले नाही. अभिनेत्रीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं पण तिची आईने दुसरं लग्न केलं नाही. तिची आई सामाजिक कार्य करत असल्याने तिला आंध्र प्रदेशातील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले होते. नंतर अदितीने दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले.

“हे नवरे लोक फोटोत…”, हेमांगी कवीच्या ‘त्या’ कमेंटवर वनिता खरातच्या नवऱ्याने दिलं उत्तर; म्हणाला, “मी मनात…”

४ वर्षात झाला घटस्फोट

आदिती राव हैदरीच्या आयुष्यात अभिनेता सत्यदीप मिश्राने प्रवेश केला. दोघे प्रेमात पडले. अदितीने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी अभिनेत्याशी लग्न केले होते आणि पण ते लग्न तिने लपवून ठेवले होते. मात्र हे नातं फारकाळ टिकलं नाही. दोघांचा अवघ्या ४ वर्षात २०१३ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर सत्यदीप मिश्राने जानेवारी २०२३ मध्ये अभिनेत्री व फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताशी दुसरं लग्न केलं.

फरहान अख्तरच्या घटस्फोटाला अदिती जबाबदार असल्याची होती चर्चा

लग्न मोडल्यानंतर काही काळानंतर आदिती रावचे नाव फरहान अख्तरशी जोडले गेले. २०१६ मध्ये ‘वजीर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते दोघे जवळ आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जाते. त्या दिवसांमध्ये दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अदितीमुळे फरहानने त्याची पहिली पत्नी अधुना भबानी हिला घटस्फोट दिल्याच्या बातम्याही आल्या होत्या, मात्र त्याने या सर्व गोष्टी निराधार असल्याचं म्हटलं होतं. नंतर फरहानने शिबानी दांडेकरशी लग्न केले.

“फरहानने मुलींच्या जन्म प्रमाणपत्रात धर्माच्या रकान्यात…”, जावेद अख्तर यांचा खुलासा

दाक्षिणात्य अभिनेत्याला डेट करतेय अदिती

अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या साऊथ अभिनेता सिद्धार्थला डेट करत आहे. दोघे अनेक इव्हेंट व इतर सोहळ्यांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. त्यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृत केले नाही, पण दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे.

Story img Loader