अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थबरोबर साखरपुडा केला आहे. साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी ती मुंबई विमानतळावर दिसली. सिद्धार्थशी साखरपुडा केल्यानंतर पहिल्यांदाच ती सार्वजनिक ठिकाणी दिसली. अदितीने एअरपोर्ट लूकसाठी डेनिम शर्टसह लेयर्ड को-ऑर्डर सेट घातला होता. ती खूप छान दिसत होती. यावेळी एका पापाराझीने तिला सिद्धार्थबद्दल विचारलं. त्यावर अदिती लाजताना दिसली.
अदितीला पापाराझीने सिद्धार्थबद्दल विचारलं. “सरांना नाही आणलं का? माफ करा, जिजाजींना नाही आणलं का?” असं विचारल्यावर अदिती लाजत हसू लागली. नंतर तिने सांगितलं की सिद्धार्थ तिच्याबरोबर आला नसून कामानिमित्त दुसरीकडे गेला आहे.
सुरुवातीला बातमी आली की अदिती आणि सिद्धार्थ यांनी श्री रंगनायकस्वामी मंदिरात एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. आगामी सीरिज ‘हीरामंडी’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही ती गैरहजर होती, तिथल्या सूत्रसंचालकाने अदितीचं लग्न असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या अफवांमध्ये भर पडली, पण अदितीने सिद्धार्थबरोबर एक फोटो शेअर केला आणि साखरपुडा केल्याचं जाहीर केलं.
अदिती राव हैदरी व सिद्धार्थ यांनी लग्न नाही तर साखरपुडा केला, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली…
२०२१ मध्ये आलेल्या तेलगू चित्रपट ‘महा समुद्रम’च्या सेटवर अदिती-सिद्धार्थची प्रेमकहाणी सुरू झाली. दोघांनी त्यांचं नातं खासगी ठेवलं होतं. पण ते बऱ्याचदा एकमेकांबरोबर फिरताना दिसायचे. तसेच एकमेकांबरोबरचे फोटो व डान्स रील शेअर करायचे. राजकुमार रावच्या लग्नालाही ते एकत्र गेले होते, मात्र नात्याबद्दल अधिकृत बोलणं टाळत होते. अखेर दोघांनी साखरपुडा करून चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली.