अभिनेत्री अदिती राव हैदरी दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला डेट करत आहे. दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. अनेकदा ते एकत्र प्रवास करताना तसेच इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसतात. पण दोघेही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे बोलणं टाळतात. अदिती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलेल्या इतर प्रश्नांची उत्तरं देते, पण सिद्धार्थशी असलेल्या नात्याबद्दल तर बोलत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“माझं करिअर बरबाद झालं”, विक्रम भट्टबरोबरच्या अफेअरबद्दल अमीषा पटेलने सोडलं मौन; म्हणाली, “१३ वर्षे मी…”

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत, तिचं सिद्धार्थशी मैत्रीपेक्षा जास्त नातं आहे का? असं विचारण्यात आलं. त्यावर आपल्या खासगी आयुष्याबद्दल सर्वांना माहिती व्हावी, असं आपल्याला वाटत नसल्याचं ती म्हणाली. “माझ्या वैयक्तिक जीवनातील कोणतीही गोष्ट, मग ते कुटुंब, मित्र किंवा कोणीही असो, माझ्यासाठी अतिशय आदरणीय आहेत. मला वाटतं की प्रत्येक गोष्टींबद्दल बोलण्यासाठी एक वेळ आणि ठिकाण असतं आणि मी त्याला प्राधान्य देते. मी डिप्लोमॅटिक किंवा विनम्र बनत नाहीये, पण माझा यावर खरोखर विश्वास आहे,” असं अदिती म्हणाली.

लग्नासाठी कसा मुलगा हवा? माधुरी पवारने सांगितली अपेक्षांची यादी; म्हणाली, “त्याला मराठी यायला हवं आणि…”

यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत अदितीने नात्याबद्दल सुरू असलेल्या अफवांकडे लक्ष देण्याची गरज वाटत नाही, असं म्हटलं होतं. “मी काम करत असल्याने मी त्याकडे पाहत बसत नाही. लोक काहीतरी बोलतील आणि आपण त्यांना बोलण्यापासून रोखू शकत नाही. त्यांना जे मनोरंजक वाटतं, ते तेच करणार. मला जे इंटरेस्टिंग वाटतं, ते मी करेन आणि मला वाटतं की ते ठीक आहे. जोपर्यंत मला माझ्या आवडत्या दिग्दर्शकांबरोबर मला आवडतं काम करायला मिळत, तोपर्यंत लोक मला स्वीकारतील आणि मला पाहतील तोपर्यंत मी खरोखर आनंदी आहे,” असं अदिती म्हणाली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi rao hydari reacts to relationship rumours with siddharth hrc