‘हीरामंडी’ फेम बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी २७ मार्च रोजी गुपचूप साखरपुडा उरकला. गेली अनेक वर्षे अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांना डेट करत होते. मागील काही महिन्यांपासून अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अखेर साखरपुड्याची पोस्ट शेअर करत अदितीने तिच्या सर्वच चाहत्यांना सुखद धक्का दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या अदिती तिच्या हीरामंडी या सीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे. यानिमित्ताने तिने नुकतीच ‘बॉलीवूड बबल’ला मुलाखत दिली. यावेळी तेलंगणामधील सुमारे ४०० वर्षे जुन्या मंदिरात साखरपुडा केल्याचं तिने सांगितलं. तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम याठिकाणी सिद्धार्थ-अदितीचा साखरपुडा पार पडला होता.

हेही वाचा : “महाराष्ट्राची लाडकी”, नम्रता संभेरावसाठी प्रसाद खांडेकरने लिहिलं खास पत्र अन् दिलं सुंदर गिफ्ट, म्हणाला, “नमा तुला…”

अदिती याबद्दल सांगते, “मला त्याठिकाणी आमच्या कुटुंबीयांबरोबर एकत्र पूजा करून साखरपुडा करायचा होता. आमचं लग्न झाल्याच्या अनेक अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. त्यामुळे इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आम्ही लग्न नव्हे तर साखरपुडा झाल्याचं सांगितलं.”

हेही वाचा : “राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पण, दुसरीकडे माझं घर विकलं”, प्रसाद ओकने पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाला, “बँकेचे हप्ते, कर्ज…”

अभिनेत्री पुढे म्हणाली, “आमच्या लग्नाच्या एवढ्या अफवा पसरल्या होत्या की, माझ्या आईला लग्नाबद्दल खात्री करून घेण्यासाठी नातेवाईकांचे फोन येत होते. त्यावेळी माझी आई म्हणाली, प्लीज आता लोकांना सांगू टाक, कारण मला सतत फोन येत आहे.”

यापूर्वी एका मुलाखतीत सिद्धार्थ म्हणाला होता, “आता आम्ही लग्न केव्हा करणार याचा निर्णय कुटुंबातील वरिष्ठ लोक घेतील. त्यांचा निर्णय आम्हा दोघांसाठी महत्त्वाचा असेल. ही काही चित्रपटाच्या शूटिंगची तारीख नाही की, मी ठरवेन तसं होईल. मोठ्या लोकांमध्ये चर्चा झाल्यावर तेच निर्णय घेतील.”

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”

अदिती-सिद्धार्थच्या नात्याबद्दल सांगायचं झालं, तर ‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये आले. २०२१ पासून यांनी आपल्या नात्यावर कुठेही उघडपणे भाष्य केलं नव्हतं. परंतु, त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना अदिती-सिद्धार्थ एकत्र असल्याची कल्पना होती. आता लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi rao hydari reveals getting engaged to siddharth at 400 year old temple in telangana sva 00