अदिती राव हैदरीनं दुसरं लग्न केल्याची बातमी समोर येताच अभिनेत्रीच्या लग्नाची चर्चा सर्वत्र सुरू झाली. दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थशी अदितीनं तेलंगणामध्ये लग्नगाठ बांधली असल्याची माहिती समोर आली होती. आता या बातमीची पुष्टी झाली असून, अदिती आणि सिद्धार्थनं खरंच लग्न केलं आहे की नाही याबद्दल एका कार्यक्रमात खुलासा झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री तिच्या आगामी नेटफ्लिक्स शो ‘हीरामंडी’च्या कार्यक्रमाला गैरहजर होती. तेव्हा कार्यक्रमातील सूत्रसंचालकानं पुष्टी केली की, ती तिच्या लग्नामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही.

‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, ‘हीरामंडी’च्या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालक सचिन कुंभार म्हणाला, “अदिती या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचं कारण आम्हाला माहीत आहे आणि ते कारण म्हणजे- आज तिचं लग्न आहे.” हीरामंडी या चित्रपटातल्या अदितीच्या सहकलाकार मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजिदा शेख व शर्मीन सेगल या कार्यक्रमात उपस्थित होत्या. सूत्रसंचालकाचं हे भाष्य ऐकून तिच्या सहकलाकारांनी स्मितहास्य केलं.

हेही वाचा… अनन्या पांडे व आदित्य कपूर खरंच करतायत का एकमेकांना डेट? अभिनेत्री स्पष्टच म्हणाली, “हे

अदिती व सिद्धार्थ यांनी २७ मार्च रोजी तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं, असं वृत्त ‘ग्रेट आंध्र’नं दिलं होतं. दरम्यान, अदिती व सिद्धार्थनं अद्याप या लग्नाबद्दल खुलासा केला नसला तरी लवकरच ते लग्नाचे फोटोज शेअर करतील, असं म्हटलं जात आहे. अदितीचे आजोबा वानपर्थी संस्थानमचे शेवटचे शासक होते त्यामुळे तिच्या कुटुंबाचा मंदिराशी दीर्घकाळ संबंध आहे. सिद्धार्थचं मूळ राज्य तमिळनाडू येथील पुजाऱ्यांनी केलेल्या हिंदू विधीनुसार हे लग्न झालं.

हेही वाचा… इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधीबरोबर झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री; म्हणाली, “मी या चित्रपटासाठी…”

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘महासमुद्रम’ चित्रपटात दोघांनी एकत्रित काम केलं होतं. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हापासून अनेकदा ते एकत्र फिरताना दिसले आहेत. चंदिगडमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. गेल्या वर्षी मुंबईत पार पडलेल्या विक्रमादित्य मोटवाने यांच्या ज्युबिली सीरिजच्या स्क्रीनिंगमध्ये या दोघांनी अधिकृतरीत्या एकत्र जोडी म्हणून रेड कार्पेटवर पदार्पण केलं.

हेही वाचा… शाहरुख खानच्या मन्नतला मागे टाकत सर्वात महागडं ठरणार रणबीर कपूरचं नवीन घर? बंगल्याला देणार लाडक्या लेकीचं नाव

दरम्यान, अदिती आणि सिद्धार्थ सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओजदेखील शेअर करीत असतात. अदिती व सिद्धार्थ दोघेही घटस्फोटित आहेत. अदितीचं पहिलं लग्न अभिनेता सत्यदीप मिश्राशी झालं होतं; तर सिद्धार्थनं मेघना नारायणशी लग्न केलं होतं. नंतर त्यांचा घटस्फोट झाला आणि आता दोघांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditi rao hydari siddharth got married confirmed by host sachin kumbhar during heeramandi show dvr