सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती राव हैदरीने दुसरं लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. तिने दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थशी तेलंगणामध्ये लग्नगाठ बांधली आहे, असं म्हटलं जात आहे. अदिती व सिद्धार्थ यांनी आज (२७ मार्च रोजी) तेलंगणातील वानापर्थी जिल्ह्यातील श्रीरंगापुरम येथील श्री रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं, असं वृत्त ‘ग्रेट आंध्र’ने दिलं आहे.

अदिती व सिद्धार्थने अद्याप लग्नाची माहिती दिली नसली, तरी लवकरच ते फोटो शेअर करतील, असं म्हटलं जात आहे. अद्याप या दोघांनी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणीही याबाबत काहीच माहिती दिलेली नाही. तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो अथवा व्हिडीओ समोर आलेले नाहीत. पण त्यांनी खासगी समारंभात साधेपणाने लग्न केल्याच्या चर्चा होत आहेत.

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

अक्षय कुमार सलग १६ फ्लॉप चित्रपटांबद्दल म्हणाला, “कोणत्याही गोष्टीने मला आजवर…”

‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं. त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आदिती व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले आणि रिलेशनशिपमध्ये होते. अनेकदा ते कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावत असतात. चंदीगडमध्ये बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा यांच्या लग्नालाही त्यांनी सोबत हजेरी लावली होती. ते शरवानंदच्या लग्नाला एकत्र गेले होते. त्या दोघांनी नात्याची जाहीरपणे कबुली दिलेली नव्हती, पण ते अनेकदा शहरात एकत्र फिरताना दिसायचे.

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

दोघेही सोशल मीडियावर एकमेकांबरोबरचे फोटो व व्हिडीओदेखील शेअर करत असतात. आता या जोडप्याने लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पण सिद्धार्थ किंवा अदितीने या वृत्ताला दुजोरा दिल्यानंतरच त्यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब होईल. अदिती व सिद्धार्थ दोघेही घटस्फोटित आहेत. अदितीचं पहिलं लग्न अभिनेता सत्यदीप मिश्राशी झालं होतं, तर सिद्धार्थने मेघना नारायणशी लग्न केलं होतं. नंतर त्यांचा घटस्फोट झाला.

Story img Loader