बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी सध्या तिच्या ‘हीरामंडी : द डायमंड बाजार’ या सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे. या सीरिजमुळे अभिनेत्रीला घराघरांत ‘बिब्बोजान’ ही नवीन ओळख मिळाली आहे. तिने साकारलेलं पात्र चांगलंच लोकप्रिय झालं आहे. अदिती नुकतीच सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या रिसेप्शन पार्टीला उपस्थित राहिली होती. यानंतर ती कामानिमित्त लंडनला रवाना झाली. परंतु, तिथे अदितीबरोबर जे काही घडतंय त्यामुळे अभिनेत्रीला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या ३२ तासांपासून अदिती एअरपोर्टवर तिच्या सामानाची प्रतीक्षा करत आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेत्री अदिती राव हैदरीने लंडनचं हिथ्रो विमानतळ आणि एका नामांकित एअरवेज विरोधात एक्स पोस्ट शेअर करत बुधवारी संताप व्यक्त केला होता. अभिनेत्री आणि तिच्याबरोबर प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांचं सामान चेकआऊट केल्यावर न मिळाल्याने हा सगळा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. संबंधित विमान कंपनीने तुमच्या समस्येचं त्वरीत निराकरण करू असं आश्वासन देऊनही अभिनेत्रीला जवळपास, ३२ तास आपल्या सामानासाठी प्रतीक्षा करावी लागली आहे.

हेही वाचा : लेक-जावयासह फोटोशूट, लग्नात केली पूजा अन्…; शत्रुघ्न सिन्हांनी शेअर केले Unseen व्हिडीओ, सोनाक्षीला अश्रू अनावर

हिथ्रो विमानतळ आणि नामांकित विमान कंपनी यांच्याबद्दल अदिती लिहिते. “मुंबईहून आमचं विमान लंडन येथे बरोबर दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी लँड झालं. तरीही आम्हाला सामान मिळालेलं नाही. प्रवासी थकून असेच बसले आहेत. लहान मुलं उपाशी आहेत. काहीजण व्हिलचेअरवर बसलेत… रिकामा लगेज बेल्ट पाहून… आमचं सामान केव्हा येईल याची आम्ही सगळेजण वाट पाहत आहोत. या लोकांना त्यांच्या जबाबदारीची जराही जाणीव नाही. विमानतळासाठी दिलेला QR कोड वगळता कोणही कसलीच माहिती देत नाही आणि यांना जबाबदारी तर मुळीच नाही!” अदितीच्या या एक्स पोस्टनंतर संबंधित विमान कंपनीने तुम्हाला लवकरात लवकर मदत करून तुमची समस्या सोडवू असं आश्वासन तिला दिलं होतं. परंतु, आता ३२ तास उलटूनही अदिती एअरपोर्टवरच अडकली आहे.

हेही वाचा : चित्रपट ‘भेटत नाही’, ‘मिळतो’! क्रांती रेडकरने चाहत्याचं व्याकरण सुधारताना सांगितलं…

अदिती राव हैदरी इन्स्टाग्राम स्टोरीज

अदितीच्या आधी देखील अनेक सेलिब्रिटींना विमानतळावर अशाप्रकारचे अनुभव आले आहेत. आता अभिनेत्रीला तिचं सामान केव्हा परत मिळणार आणि तिच्या एअरपोर्टवरील समस्यांचं निराकरण केव्हा होणार याकडे अदितीच्या सर्व चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.