दिवंगत यश चोप्रा यांच्या पत्नी व ज्येष्ठ पार्श्वगायिका पामेला चोप्रा यांचं २० एप्रिल रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने चोप्रा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूड कलाकार राणी मुखर्जी, आदित्य चोप्रा व उदय चोप्राची भेट घेत त्यांचं सांत्वन करत आहेत, तसेच पामेला चोप्रा यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. राणीचा पती व चित्रपट निर्माता आदित्य हा आईच्या खूप जवळ होता. आईच्या निधनाचा त्याला मोठा धक्का बसला आहे.

“हे लग्नाचं रिसेप्शन नाही”; आईच्या निधनानंतर आमिर खानला भेटताना हसणारा उदय चोप्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले, “निर्लज्ज…”

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Shruti Haasan With Parents
“लोक माझ्याकडे बोट दाखवायचे अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्री घटस्फोटित आई-वडिलांना म्हणाली ‘हट्टी’
Marathi actress Vishakha Subhedar statement talking about divorce
“लग्नसंस्था आता आपण समाजानेचं मोडीत काढल्यात…”, घटस्फोटाबाबत बोलताना विशाखा सुभेदारचं वक्तव्य, म्हणाली…
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
emboldened rioters attacked police officer in nashik
पतीचा पत्नी, मेहुणी, सासऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला

एबीपी लाइव्हने चोप्रा कुटुंबातील एका जवळच्या मित्राच्या हवाल्याने वृत्त दिलंय. “आदित्य जास्त बोलत नाहीये. पूर्वीपासूनच तो कमी बोलतो. तो या दु:खातून बाहेर पडू शकत नाहीये. त्याची पत्नी राणी पूर्णपणे आदित्यची काळजी घेत आहे. पामेला चोप्रा यांच्याकडे खूप कमी वेळ असल्याची जाणीव कुटुंबियांना होती. त्या गेल्या काही आठवड्यांपासून रुग्णालयात दाखल होत्या. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली होती. असे होणार हे आदित्यला माहीत होते पण तरीही आई वडिलांचं जाणं स्वीकारणं शक्य नाही,” असं चोप्रा कुटुंबातील मित्राने सांगितलं.

Videos: शाहरुख खान ते बच्चन कुटुंब, बॉलिवूड कलाकारांनी वाहिली पामेला चोप्रांना श्रद्धांजली, सासूच्या निधनाने कोलमडली राणी मुखर्जी

“उदय आणि आदित्य दोन्ही भावांपैकी आदित्य त्याच्या आईच्या खूप जवळ होता आणि तिच्यावर अवलंबून होता. विशेषत: यशजींच्या निधनानंतर तो सर्व महत्त्वाचे निर्णय आईचा सल्ला घेऊनच घ्यायचा. पण आता त्याही नाहीत, त्यामुळे आदित्यला धक्का बसला आहे. संपूर्ण कुटुंब ‘पठाण’च्या यशाने आनंदी होते, अशातच पामेला चोप्रांचं निधन झालं. अलीकडच्या काळात बॅनरला आलेल्या अपयशाची त्यांना काळजी वाटत होती. पण ‘पठाण’ने चेहऱ्यावरील हास्य परत आणले, हे यश पाहिल्यानंतर त्यांचं निधन झालं,” असंही चोप्रा कुटुंबाच्या मित्राने सांगितलं.