२०२२ साली प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची चर्चा अजूनही होते. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान चालला अन् प्रेक्षकांनीही तो उचलून धरला. काश्मिरी पंडितांच्या पलायन आणि नरसंहारावर बेतलेल्या या चित्रपटाने कित्येकांची झोप उडवली अन् देशात यावरुन बरेच वादही निर्माण झाले. आता पुन्हा एकदा काश्मीर आणि खासकरून ‘आर्टिकल ३७०’वर भाष्य करणारा अन् ते कलम हटवण्यामागची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणारा ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये यामी एका NIA अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे, जीला काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्याची तसेच दहशतवाद्यांची मोहीम हाणून पडायची जबाबदारी देण्यात आलेली आहे. चित्रपटात ‘३७० कलम’ हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य केलं असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे.

आणखी वाचा : “चेहेरा धुवून ये”, जेव्हा मेक-अप केलेल्या प्रीती झिंटाला ‘दिल से’च्या सेटवर मणी रत्नम यांनी दिलेली सूचना

चित्रपटात ‘रामायण’ सिरियलमध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात अरुण गोविल हे ३७० कलम हटवण्याबाबत आश्वासन देताना दिसतात. याबरोबरच काश्मीरमध्ये उग्रवादी गटाकडून होणारी हिंसा, दगडफेक, फोफावलेला आतंकवाद याविषयीही चित्रपटात बेधडकपणे मांडलं असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होत आहे.

हा चित्रपट आणि ही भूमिका ही अत्यंत साहसी आहे अन् अशी आव्हानात्मक भूमिका आजवर कधीच मिळालेली नसल्याचं यामीने ट्रेलर लॉंचदरम्यान स्पष्ट केलं. चित्रपटात यामी गौतमसह प्रियामणी, राज जुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षेसारखे मुरलेले कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. याबरोबरच चित्रपटात एकाहून एक दमदार असे डायलॉगही असणार हे ट्रेलरमध्ये दिसत आहे. ट्रेलरच्या शेवटी संसदेत एक मंत्री, “काश्मीर भारत का हिस्सा था, है और रहेगा.” असं म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दमदार अॅक्शन, देशभक्तीचा जबरदस्त तडका, काश्मीर व कलम ३७० सारखा संवेदनशील विषय आणि अप्रतिम कलाकारांची मांदियाळी असलेला ‘आर्टिकल ३७०’ २३ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. यामीचा पती आदित्य धर यानेच लोकेश धरसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Story img Loader