पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांचे आयुष्य, त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग, कलाकारांनी संकटांवर कशी मात केली, ते त्यांच्या घरात कसे राहतात व वागतात याविषयी चाहत्यांना खूप उत्सुकता असते. कलाकारदेखील आपल्या खासगी आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी, प्रसंग वेळोवेळी सोशल मीडिया अथवा मुलाखतींच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असतात, त्यांच्याबरोबर शेअर करीत असतात. आता अभिनेत्री दिव्या दत्ताने आपल्या करिअरसंबंधित एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकत्याच सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले आहे की, माझ्या करिअरमध्ये असा एक काळ आला होता की, जेव्हा मी एकदम २२ चित्रपट साइन केले होते आणि त्यानंतर मी आदित्य चोप्राला भेटण्यासाठी गेले होते. ‘आजा नच ले’ चित्रपटाच्या आधी की नंतर हे मला फारसे आठवत नाही. आदित्यने मला विचारले, ‘काय झालं?’ मी त्याला सांगितलं की, मी २२ चित्रपट करीत आहे. मला वाटले हे ऐकून त्याला आनंद होईल आणि तो माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देईल. पण, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तिथे फक्त शांतता होती. त्याच्या अशा गप्प राहण्याने मी कोड्यात पडले.
मला प्रश्न पडला की, जवळजवळ मी दोन डझन चित्रपट साइन केल्यानंतरही आदित्यने मला शुभेच्छा का दिल्या नाहीत. मला त्यामागचे कारण जाणून घ्यायचे होते आणि त्यामुळे मी त्याला विचारले की, तू आनंदी नाहीस का? त्याने मला विचारले, “तुला पैशांची गरज आहे का?” मी म्हटलं, नाही. “मग तू इतके चित्रपट का करते आहेस?”

हेही वाचा: फिल्मी करिअर फ्लॉप पण लक्झरी आयुष्य जगतो सुझान खानचा भाऊ, जायेद खानच्या संपत्तीचा आकडा वाचून चकित व्हाल

आदित्यने विचारलेल्या त्या प्रश्नानंतर मी आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली आणि स्वत:बद्दल विचार करायला लागले, मी इतके चित्रपट का करते आहे? मला जाणवले की, जेव्हा जेव्हा मला एखाद्या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तेव्हा मला चांगले वाटले. इंडस्ट्रीमध्ये मला मागणी आहे, असे वाटायचे. मी याआधी ज्या नकारांचा सामना केला होता, त्याऐवजी मी जवळजवळ जास्त भरपाई करीत होते. त्यामुळे मी २२ चित्रपट साइन केले होते, असे दिव्या दत्ताने म्हटले आहे. हळूहळू मला ज्या गोष्टींमध्ये मनापासून आनंद मिळतो, त्या गोष्टी निवडायला मी सुरुवात केली आणि त्यानंतर माझ्या करिअरमध्ये अनेक बदल झाले. दिव्या दत्ताने ‘इश्क में जीना इश्क में मरना’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. दिव्या शेवटची ताहिरा कश्यप दिग्दर्शित ‘शर्माजी की बेटी’मध्ये परवीन दाबास आणि साक्षी तन्वरसोबत दिसली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya kapoor make self realisation bollywood actress divya dutta after she sign 22 films nsp