अभिनेत्री आलिया पांडेची चुलत बहीण अलाना पांडेचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. चंकी पांडेंच्या कुटुंबासह गौरी खान, बिपाशा बासूसह अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनन्या पांडेचा बॉयफ्रेंड आदित्य रॉय कपूरदेखील अलानाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पोहोचला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलानाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला पोहोचलेल्या आदित्य रॉय कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अलानाच्या घरी जाताना आदित्यने पापाराझींना पोज दिल्या. यावेळी त्याने डेनिम शर्ट व तपकिरी रंगाची पँट घातली होती. ‘फिल्मीग्यान’ने आदित्यचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये आदित्य पापाराझींना पोज दिल्यानंतर अलानाच्या घरात गेला. हा व्हिडीओ समोर आल्यावर आदित्य व अनन्याच्या नात्याला पांडे कुटुंबियांची मंजूरी मिळाल्याच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.

बाईकने रोड ट्रिपवर निघालाय सुप्रसिद्ध अभिनेता, कॅम्पमध्ये मित्रांसाठी बनवला खास पदार्थ, व्हिडीओ व्हायरल

अनन्या व आदित्य जवळपास वर्षभरापासून एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यांच्या व्हेकेशनचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये एकत्र वॉक केला होता. आताही बॉलीवूडमधील अनेक कार्यक्रमांना ते एकत्र हजेरी लावतात.

अलाना व आयव्हरबद्दल बोलायचं झाल्यास ते अनेक वर्षांपासून एकमेकांसह डेटिंग करत होते, त्यानंतर त्यांनी वर्षभरापूर्वी १६ मार्च २०२३ रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली. अलाना ही चंकी पांडे यांचे भाऊ चिक्की पांडे यांची मुलगी आहे. २८ वर्षीय अलाना सोशल मीडिया स्टार असून खूप लोकप्रिय आहे. तिचा पती आयव्हर हा व्हिडीओग्राफर आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya roy kapur attended ananya panday sister alanna baby shower video viral hrc