‘आशिकी २’ फेम अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या महिन्यात आदित्य कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडेचे स्पेनमधील रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हायरल फोटोंवर अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “७२ वर्षांचा हिरो अन् ३३ वर्षांची हिरोईन”, तमन्ना भाटियाने ट्रोलर्स दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ” वयाने काय फरक…”

आदित्य रॉय कपूरला हिंदुस्थान टाइम्सच्या मुलाखतीत अनन्याच्या आणि त्याच्या व्हायरल फोटोंबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “मी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नाही ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण, मी याबद्दल ऐकले आहे…मला ब्रेक हवा होता म्हणून मी बाहेर गेलो होतो. या सगळ्यात मी मुंबईचा पाऊस खूप मिस केला. आता फिरून आल्यावर सलग १ आठवडा मुंबईत पाऊस पडत आहे.” आदित्यने दिलेल्या या सावध उत्तराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा : “रणवीरने पहिल्याच दिवशी चुकीचा सीन…”, करण जोहरने सांगितला सेटवरचा किस्सा; म्हणाला, “त्याला ४ तास…”

स्पेननंतर आदित्य आणि अनन्याला पापाराझींनी मुंबईत एकत्र पाहिले. दोघेही ‘बार्बी’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी अनन्याने गुलाबी रंगाचा ड्रेस तर, आदित्यने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला होता. गेल्यावर्षी क्रिती सेनॉनच्या दिवाळी पार्टीमध्ये या दोघांनाही सर्वप्रथम एकत्र पाहण्यात आले. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चांना सुरुवात झाली होती.

हेही वाचा : “स्वतःच्या मुलीला परदेशात पाठवून हा बहुजनांच्या मुलांची माथी भडकवतोय” या टीकेवर शरद पोंक्षे म्हणाले, “ही गाढवं…”

दरम्यान, दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री अनन्या पांडे लवकरच ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आदित्य रॉय कपूर अनुराग बासूच्या ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटात सारा अली खानसह मुख्य भूमिकेत दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya roy kapur breaks silence on viral photos with rumored lady love ananya panday sva 00