बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या अफेअरच्या सध्या बी-टाउनमध्ये जोरदार चर्चा आहेत. दोघेही अनेकदा एकत्र इव्हेंटला हजेरी लावतात. इतकंच नाही तर दोघांचे परदेशातील व्हेकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते. अशातच आता एका नवीन व्हिडीओमध्ये अनन्या बॉलीवूड अभिनेत्री व आदित्यची वहिनी विद्या बालनबरोबर दिसली आहे.

कतरिना कैफच्या दिराला महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, फोटो चर्चेत

विद्या बालन व अनन्या पांडे एकमेकांचे हात पकडून ‘तुमसे ना हो पाएगा’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंग कार्यक्रमात पोहोचल्या. यावेळी विद्याने अनन्याबरोबर पोजही दिल्या. विद्याने को-ऑर्ड सेट घातला होता, तर अनन्या निळी जीन्स आणि पिवळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये सुंदर दिसत होती. दरम्यान, दोघींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी दोघींना एकमेकींच्या जाऊबाई म्हणणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.

दोघींच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

Ananya Pandey with Vidya Balan 1
नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, आदित्य रॉय कपूर व अनन्या पांडेने अद्याप त्यांच्या नात्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांचे फोटो व्हायरल होत असतात. काही महिन्यांपूर्वी आदित्य आणि अनन्या एकत्र पोर्तुगालमध्ये एकमेकांबरोबर वेळ घालवताना दिसले होते. त्यापूर्वी ते स्पेनमधील लाइव्ह कॉन्सर्टनंतर लिस्बनमधील एका रेस्टॉरंटमध्ये बसलेले दिसले होते.

सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर एकत्र पोहोचले होते, तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर अनन्याने आदित्य रॉय कपूरच्या ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजच्या प्रीमियरलाही हजेरी लावली होती. दोघांनी लॅक्मे फॅशन विकमध्ये एकत्र वॉक केला होता आणि रोमँटिक पोजही दिल्या होत्या.

Story img Loader