बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरने यापूर्वी लंडन ड्रीम्स, ॲक्शन रिप्लाय, गुजारिश अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र, अभिनेता ‘आशिकी २’ चित्रपटामुळे रातोरात स्टार झाला. सध्या आदित्य कपूर त्याच्या ‘द नाइट मॅनेजर’ या सीरिजमुळे चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : Video: मुंबई बॉम्बस्फोट, तरुणांचे ब्रेनवॉश अन्…सेन्सॉर बोर्डाने नाकारल्यानंतरही निर्मात्यांनी प्रदर्शित केला ’72 Hoorain’चा ट्रेलर

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Aata Hou De Dhingana Season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अद्वैतने कलासाठी आणली सवत; पतीला जिंकण्यासाठी कला लावतेय ताकद…; व्हिडीओ व्हायरल
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Devendra Fadnavis On Local Body Election
Devendra Fadnavis : आगामी महापालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पुढील तीन-चार महिन्यांत…”
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांचा ‘आशिकी २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरल्यामुळे टी-सीरिज आणि विशेष फिल्म्सने अलीकडेच ‘आशिकी ३’ चित्रपटाची घोषणा केली. ‘आशिकी ३’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग बसू यांच्याकडे सोपवण्यात आली असून यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिका साकारणार आहे. दरम्यान, ‘द नाइट मॅनेजर’ सीरिजच्या पत्रकार परिषदेत आदित्य रॉय कपूरला ‘आशिकी ३’मध्ये तू काम करणार का? याबद्दल विचारण्यात आले.

हेही वाचा : करण जोहरने मागितली आलिया भट्टची माफी; पोस्ट शेअर करत म्हणाला, “‘तुम क्या मिले’ गाण्याचे शूटिंग करताना…”

‘आशिकी २’ मध्ये आदित्यने राहुल जयकरची भूमिका साकारली होती. पत्रकार परिषदेत आदित्य हसत उत्तर देत म्हणाला, मला वाटत नाही की मी ‘आशिकी ३’ मध्ये असेन कारण, ‘आशिकी २’च्या क्लायमॅक्समध्ये राहुल जयकर आत्महत्या करतो असे दाखवण्यात आले होते. मला अनेकांनी तू तिसऱ्या भागात काम करणार का? असे विचारले आहे आणि मला सुद्धा काम करण्याची इच्छा आहे परंतु, ते शक्य नाही.

हेही वाचा : “तुम क्या मिले…” अरिजित सिंहच्या आवाजाने जिंकली प्रेक्षकांची मनं; रणवीर-आलियाच्या ‘रॉकी और रानी…’मधील पहिलं गाणं रिलीज

आदित्य रॉय कपूर पुढे म्हणाला, “जेवढ्या गोष्टी मी ऐकल्या आहेत त्यावरून असे समजते की, ‘आशिकी ३ ‘साठी निर्माते खूप चांगली टीम बनवत आहेत. एक प्रेक्षक म्हणून मला ‘आशिकी ३’ पाहायला नक्की आवडेल.” यावेळी दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी आदित्यचा माइक खेचून घेत सांगितले, “‘आशिकी ४’ निर्माते माझ्याबरोबर बनवत आहेत.”

दरम्यान, ‘द नाइट मॅनेजर’ सीरिजचा पहिला भाग १७ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. या सीरिजचा दुसरा भाग ३० जूनला डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader