Munjya Box Office Collection: सुपरहिट ‘स्त्री’ चित्रपट निर्मात्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी हॉरर-कॉमेडी चित्रपट आणला आहे. अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज अभिनीत ‘मुंज्या’ चित्रपट ७ प्रदर्शित झाला आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि वीएफएक्सने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची जोरदार कमाई सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मुंज्या’ चित्रपटाचं कौतुक प्रेक्षकांसह समीक्षकांनी केलं असून एमआयडीबीवर चित्रपटाला १० पैकी ७.२ रेटिंग देण्यात आलं आहे. एकाबाजूला सर्वकाही सुरळीत चालताना दिसत असलं तरी दुसऱ्याबाजूला चित्रपटाला स्क्रीन्स कमी मिळत आहे. पण ज्या प्रकारे चित्रपट दिवसेंदिवस आधिकाधिक कमाई करत आहे, तर स्क्रीन्सचेही प्रमाण वाढले अशी शक्यता वर्तवली गेली आहे. ‘मुंज्या’ चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली? जाणून घ्या…

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकरने वडिलांच्या व्यवसायाच्या ठिकाणी केलं फोटोशूट, म्हणाली, “बालपणीचा…”

सध्या बॉक्स ऑफिसवर ‘मुंज्या’ चित्रपटाला टक्कर देण्यासारखा कुठलाही चित्रपट नाहीये. याचाच फायदा ‘मुंज्या’ला झाला आहे. प्रदर्शनानंतरच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने ४ कोटी २१ लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. समीक्षकांनी अंदाज लावला होता की, ‘मुंज्या’ चित्रपट पहिल्या दिवशी १.५ ते २ कोटींचा गल्ला जमवेल. पण याच्या दुप्पट कमाई चित्रपटाने केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या व्यवसायात आणखी मोठी वाढ झाली आहे.

हॉरर-कॉमेडी ‘मुंज्या’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ६ कोटी ७५ लाखांची कमाई केली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत या चित्रपटाने एकूण १० कोटी ९६ लाखांचा व्यवसाय केला आहे. फक्त ३० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘मुंज्या’ सध्या जोरदार कमाई करत आहे. मोठी स्टारकास्ट नसली तरी चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद हा कौतुकास्पद आहे. येणाऱ्या दिवसांत कमाईचा चढता क्रम तसाच राहतो की खाली घसरतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा – Video: ड्रेसची लुंगी करत सोनाली कुलकर्णीचा ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

दरम्यान, बॉक्स ऑफिसवर जान्हवी कपूर व राजकुमार रावचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपट देखील कमाई करत आहे. पण ‘मुंज्या’च्या तुलनेत या चित्रपटाची कमाई धिम्या गतीने सुरू आहे. शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटाची दमदार ओपनिंग झाली होती. पण दुसऱ्या दिवसांपासूनच कमाईचा वेग मंदावला. काल प्रदर्शनानंतर दुसऱ्या शनिवार होता. या दिवशी जान्हवी व राजकुमारच्या चित्रपटाने २.१५ कोटींचा गल्ला जमावला. पहिल्याच दिवशी ६.८५ कोटींचा व्यवसाय या चित्रपटाने केला होता. पण त्यानंतर कमाईत हळूहळू घट होऊ लागली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya sarpotdar directed munjya movie box office collection 2 day pps