Munjya Box Office Collection: ‘माऊली’, ‘क्लासमेट्स’, ‘फास्टर फेणे’, ‘उनाड’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या आदित्य सरपोतदार यांचा ‘मुंज्या’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करताना दिसत आहे. कोकणातल्या मुंज्याची कथा प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली आहे. अनेक हिंदी चित्रपटांना टक्कर देऊन ‘मुंज्या’ची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घोडदौड सुरू आहे. आता हॉरर-कॉमेडी चित्रपटाने आता १०० कोटींचा आकडा पार केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ जूनला प्रदर्शित झालेल्या ‘मुंज्या’ चित्रपटात अभिनेत्री शर्वरी वाघ, अभय वर्मा, मोना सिंह आणि सत्यराज महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. याशिवाय बरेच मराठी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळाले. ‘मुंज्या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४.२१ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ होताना दिसली.

हेही वाचा – Video: सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या मुलाला पाहिलंत का? सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शनमध्ये दिसला हटके लूकमध्ये

पहिल्या आठवड्यात चित्रपटाने ३६.५० कोटी तर दुसऱ्या आठवड्यात ३४.५० कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आता ‘मुंज्या’ चित्रपटाचं नाव १०० कोटींच्या क्लबमध्ये सामिल झालं आहे. आतापर्यंत आदित्य सरपोतदर यांच्या ‘मुंज्या’ चित्रपटाने १०३ कोटींची कमाई केली आहे. काल, १७व्या दिवशी चित्रपटाने ७.२० कोटींची कमाई केली होती.

हेही वाचा – Video: लग्नात सोनाक्षी सिन्हाने राहत फतेह अली खानच्या गाण्यावर ‘अशी’ केली जबरदस्त एन्ट्री, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बालनं नोंदणी पद्धतीनं केलं लग्न, अभिनेत्री खास क्षणांचे फोटो शेअर करत म्हणाली, “सात वर्षांपूर्वी…”

दरम्यान, कोकणात प्रचलित असलेल्या मुंज्याच्या दंतकथेचा आधार घेत या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली आहे. कोकणात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. या हिंदी चित्रपटात ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे मराठी कलाकार झळकले आहेत. या चित्रपटाचं कौतुक चारही बाजूने होतं आहे. समीक्षकांनी देखील ‘मुंज्या’ चित्रपटाविषयी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aditya sarpotdar directed munjya movie box office collection cross 103 crore pps