गायक अदनान सामी मूळचा पाकिस्तानी आहे, पण त्याने भारतीय नागरिकत्व घेतलं आणि तो भारतात राहतो. बऱ्याचदा यावरून पाकिस्तानमधील नेटकरी ट्रोल करत असतात. त्याने पैशांसाठी भारतीय नागरिकत्व घेतल्याला आरोपही त्याच्यावर होत असतो. यावर आता या गायकाने प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या नागरिकत्वावरून टीका करणाऱ्यांना अदनान सामीने सुनावलं आहे.
परिणीती चोप्राशी अफेअरच्या चर्चांवर खासदार राघव चड्ढा यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना अदनान म्हणाला, “पाकिस्तानातील काही लोक म्हणाले की मी जास्त पैसे मिळतात म्हणून भारताला निवडलं. मी म्हणालो, “थांबा, तुम्हाला माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीची कल्पना आहे का? माझ्या आयुष्यात पैसा हा इतका महत्त्वाचा घटक कधीच नव्हता हे तुम्हाला माहीत आहे का? तिथे मी एका अत्यंत संपन्न कुटुंबात जन्मलो आहे. माझ्याकडे कधीच पैशाची कमतरता नव्हती आणि जर फक्त पैशाची गोष्ट असती तर मी पाकिस्तानमध्ये माझं जे काही सोडलं आहे, ते सोडलं नसते.”
परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? समोर आलं सत्य
“माझं भारतावर प्रेम आहे, एवढी छोटीशी गोष्ट समजणं लोकांसाठी इतकं अवघड का आहे, हेच मला कळत नाही. मला भारत माझं घर आहे, असं वाटतं, त्यामुळे मी इथलं नागरिकत्व घेतलं. एक कलाकार म्हणून इथं मिळणारं प्रेम आणि कौतुक आवडतं. दोन्ही देशांमध्ये ज्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, त्यामुळे स्वत:साठी येथील नागरिकत्व मिळणे खूप कठीण होते, पण आपण संगीतकार असल्याने त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही,” असं अदनान म्हणाला.