‘पठाण’ हिट झाल्यावर शाहरुख खानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. शाहरुखने ‘जवान’ची घोषणा करताच सर्वांचे लक्ष या चित्रपटाकडे लागले. यातील त्याच्या फर्स्ट लूक, टीझरचीही प्रेक्षकांनी खूप प्रशंसा केली.  तर आता नुकतंच या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ सप्टेंबर रोजी शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे ओटीटी अधिकार विकले गेले आणि त्यातून या चित्रपटाने ३५० कोटींची कमाई केली आहे. तर आता या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून त्याला देखील प्रेक्षक तितकाच चांगला प्रतिसाद देत आहेत.

आणखी वाचा : शाहरुख खानच्या ‘जवान’ने रचला नवा विक्रम, प्रदर्शनाआधीच चित्रपटाने कमावले ‘इतके’ कोटी

मीडिया रिपोर्टनुसार, युएई, अमेरिका, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. तर या सगळ्या देशांमध्ये प्रदर्शनाच्या जवळपास २० दिवस आधीच ५० ते ६०% तिकीट विकली गेली आहेत. त्यामुळे पठाणच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून 1.5 मिलियन कमाईचा आकडा जवान मोडणार असं चित्र दिसत आहे.

हेही वाचा : शाहरुख खानचा ‘कार’नामा! खरेदी केली नवी कोरी रोल्स रॉयस; किंमत वाचून व्हाल आवाक्

‘जवान’मध्ये शाहरुख खानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नयनताराचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. तर दक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसेल. याचबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे या चित्रपटामध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे भारतात ॲडव्हान्स बुकिंग कधी सुरू होणार याकडे शाहरुखच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Advance booking of shahrukh khan starrer jawan film has started in us germany dubai and australia know the response rnv