शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘पठाण’ला मिळालेल्या यशानंतर आता चाहते त्याच्या ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना यातील शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पसंत पडले आहेत. आता या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं असून प्रदर्शनाआधीच या चित्रपटाने चांगली कमाई करायला सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या शुक्रवारपासून ‘जवान’चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं आहे. शाहरुख खाननेही याबद्दल सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. शाहरुखचे चाहते अन् सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. याबरोबरच शाहरुख खानचे वेगवेगळे फॅनक्लबसुद्धा या चित्रपटाचे वेगवेगळे शोज आयोजित करत आहेत.

आणखी वाचा : “मी त्यांच्यापुढे हात जोडले पण…” ‘OMG 2’ ला ‘युए सर्टिफिकेट’ देण्याबद्दल दिग्दर्शक अमित राय यांचं स्पष्टीकरण

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक आणि ट्रेड एक्स्पर्ट तरण आदर्श यांनी याबद्दल एक नवी माहिती दिली आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच काही तासांतच ‘जवान’ची तब्बल ४२००० तिकिटे विकली गेली आहेत. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीनही चेन्सची मिळून ४२००० हून अधिक तिकिटे विकली गेली असल्याचं तरण आदर्श यांनी सांगितलं आहे.

‘जवान’ हा शाहरुखचा या वर्षातील दुसरा चित्रपट आहे. जवाननंतर, तो राजकुमार हिरानीच्या ‘डंकी’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वर्षी प्रदर्शित झालेला ‘पठाण’ हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा शाहरुखच्या ‘जवान’वर खिळल्या आहेत.