सध्या बॉलिवूड अभिनेत्यांना मराठी चित्रपटांची भुरळ पडली असून, बऱ्याच महापुरुषांच्या भूमिका येत्या काळात बॉलिवूड कलाकार साकारताना दिसणार आहेत. मध्यंतरी महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातील अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक चांगलाच व्हायरल झाला होता. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरणही सुरू झालं असून प्रेक्षक अक्षय कुमारला महाराजांच्या भूमिकेत पाहण्यास फारच उत्सुक आहेत.

याबरोबरच ‘सॅम बहादुर’सारख्या ताकदीच्या भूमिका पेलणारा विकी कौशलही लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. विकीचा या चित्रपटासाठीचा लुकची सध्या चांगलाच चर्चेत आहे. आता अक्षय आणि विकीपाठोपाठ आणखी एक बॉलिवूड अभिनेता छत्रपतींच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Confusion due to incorrect announcements in running local trains
पुढील स्थानक ‘चुकीचे’! धावत्या लोकल गाड्यांमधील चुकीच्या उद्घोषणांमुळे संभ्रमावस्था
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

आणखी वाचा : “मला प्रचंड राग…” पूनम पांडेच्या पब्लिसिटी स्टंटवर इरफानचा मुलगा व अभिनेता बाबिल खानची खरमरीत प्रतिक्रिया

‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार ‘ओह माय गॉड २’चे दिग्दर्शक अमित राय हे लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एक भव्य चित्रपट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात अमित राय शाहीद कपूरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच चित्रपटाशी जोडलेल्या काही निर्मात्यांनासुद्धा शाहिदच या भूमिकेसाठी योग्य वाटत आहे. शाहिद कपूरनेही या प्रोजेक्टमध्ये रुची दर्शवली आहे.

अद्याप चित्रपटाच्या घोषणेबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नसून एका मोठ्या निर्मात्याची सगळेच वाट बघत आहेत. त्यामुळे लवकरच या चित्रपटाची घोषणा होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाहीद कपूर हा वेगवेगळ्या भूमिका स्वीकारत असल्याने त्याच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळेच या भूमिकेसाठी शाहिदचा विचार केला जात आहे. लवकरच शाहिद क्रीती सेनॉनबरोबरच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा एंट्री घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आता शाहीद कसा वाटतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Story img Loader