रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जगभरात १०० कोटींचा तर दुसऱ्या दिवशी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. मीडिया रीपोर्टनुसार ११ व्या दिवशी ‘अ‍ॅनिमल’ने ७०० कोटींचाही टप्पा पार केला आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूरसह बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

आणखी वाचा : केएल राहुलच्या बाबतीत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सुनील शेट्टी प्रथमच बोलला; म्हणाला, “मलाही प्रचंड…”

Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Kishkindha Kaandam OTT Release
फक्त सात कोटींचे बजेट, कमावले तब्बल ‘इतके’ कोटी; OTT वर रिलीज होतोय ‘हा’ सुपरहिट चित्रपट
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

चित्रपटात रणबीरबरोबरच बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी या दोघांच्या कामाची प्रचंड चर्चा होत आहे. बॉबी देओलला तर या चित्रपटामुळे एक वेगळी ओळखच मिळाली आहे. आता या सुपरहीट चित्रपटात छोटी पण भाव खाऊन जाणारी भूमिका केल्यानंतर बॉबी आता तमिळ चित्रपटातून पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.

खुद्द बॉबीनेच ही गोष्ट स्पष्ट केली आहे की लवकरच तो सूर्याच्या ‘कंगुवा’ या चित्रपटात झळकणार आहे. तमिळ दिग्दर्शक शिवा यांच्या ‘कंगूवा’मध्ये बॉबी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे अन् त्यासाठी बॉबीने तयारी करायलाही सुरुवात केली आहे. ‘इंडिया टूडे’शी संवाद साधताना बॉबी देओलने त्याच्या या भूमिकेबद्दल खुलासा केला, तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं त्याने स्पष्ट केलं.

मुलाखतीदरम्यान बॉबी म्हणाला, “तुमची माहिती योग्य आहे, मी सूर्याबरोबर ‘कंगुवा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची टीमही जबरदस्त आहे. शिवा हे फार प्रेमळ आहेत तर सूर्या हा एक अद्भुत नट आहे यामुळेच त्यांच्याबरोबर काम करण्यास मी उत्सुक आहे. ही भूमिका माझ्या नेहमीच्या पठडीतील भूमिकांपेक्षा वेगळी आहे. अगदी एक दोन महिन्यात तमिळ शिकता येणं कठीण आहे पण मी यावर मेहनत घेत आहे.”

‘कंगुवा’ने प्रदर्शनाआधीच ओटीटी हक्कांच्या माध्यमातून तब्बल ८० कोटी कमावले आहेत. इतकंच नाही तर हे हक्क फक्त दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटासाठी असल्याचं निर्मात्याने स्पष्ट केलं आहे. याबरोबरच हा चित्रपट मनोरंजनविश्वात एक वेगळाच इतिहास रचणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे. हा चित्रपट दोन चार नव्हे तर तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. इतकंच नव्हे तर हा चित्रपट ‘३डी’ आणि ‘आयमॅक्स’ या दोन्ही व्हर्जनमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जगातील भाषेच्या सीमेपलीकडे जाऊन काहीतरी नवीन करायचा उद्देश निर्मात्यांचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजून फक्त या चित्रपटाची घोषणा झालेली आहे. याच्या टीझर ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. ‘कंगुवा’ हा चित्रपट तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सूर्याबरोबरच बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीदेखील दिसणार आहे. या चित्रपटातून दिशा तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. २०२४ च्या सुरुवातीलाच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.