Arshad Warsi Comment on South Indian Movies: अभिनेता अर्शद वारसी त्याने प्रभासबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटात प्रभास (Prabhas) जोकरसारखा वाटतोय असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने केलं होतं. यानंतर दाक्षिणात्य कलाकारांनी त्याच्यावर खूप टीका केली होती, अशातच आता त्याचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्याने दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल कमेंट केली होती.

अर्शद वारसीचे प्रभासबद्दल वक्तव्य आणि व्हायरल झालेला व्हिडीओ दोन्ही सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अर्शदने नुकताच प्रभासबद्दल ‘जोकर’ हा शब्द वापरल्याने दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीतील चाहते संतप्त झाले आहेत. याच दरम्यान त्याचा एक जुना व्हिडीओही चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्याने साऊथच्या चित्रपटांबद्दल आपलं मत मांडलंय. या व्हिडीओमध्ये तो दक्षिणेतील चित्रपटांना ‘टाइमपास’ असं म्हणतो. हे चित्रपट केवळ मनोरंजनासाठी असतात, ते बघताना जास्त डोकं लावायची गरज नाही, असं तो यात म्हणतोय.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Savlyachi Janu Savali
Video: सावली द्विधा मनस्थितीत अडकणार; भैरवीला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “डॅडीसारखा देवमाणूस…”, शत्रूचे स्वप्न पूर्ण होणार अन् तेजूचे आयुष्य पालटणार; सूर्याने केली बहिणीची पाठवणी, पाहा प्रोमो

अर्शद वारसीने प्रभासला म्हटलं जोकर; ‘कल्की 2898 एडी’चा दिग्दर्शक उत्तर देत म्हणाला, “मी त्यांच्या मुलांसाठी…”

अर्शद वारसी व्हिडीओत काय म्हणतो?

अर्शदचे हे वक्तव्य जुने असले तरी आता त्याने प्रभासबद्दल केलेल्या कमेंटनंतर साऊथ चित्रपटांच्या चाहत्यांना ते आवडलेले नाही. व्हिडीओमध्ये अर्शद म्हणतो, “माझ्या घरात काम करणारे सर्व लोक साऊथचे डब केलेले चित्रपट पाहतात. ते चित्रपट खूप मनोरंजक असतात. जर रजनीकांत एवढे मोठे स्टार आहेत, तर त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल. या चित्रपटांबद्दल जास्त विचार करण्याची किंवा डोकं लावायची गरज नाही. पण दाक्षिणात्य चित्रपट पूर्णपणे टाइमपास आहेत. गाड्या उडत असतात, माणसं उडत असतात आणि स्टाइलमध्ये सिगारेट ओढल्या जातात. तुम्ही पॉपकॉर्न खा, चित्रपट पाहा आणि घरी जा,” असं अर्शद म्हणाला.

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

अर्शद वारसीने प्रभासबद्दल काय म्हटलं?

प्रभासच्या भूमिकेबद्दल अर्शद म्हणाला, “प्रभासला पाहून मला खरोखर खूप वाईट वाटलं. तो काय होता? तो एखाद्या जोकरसारखा वाटत होता. का? मला मॅड मॅक्स बघायचा आहे. मला मेल गिब्सनला तिथं बघायचं आहे. तुम्ही त्याला काय बनवलं, का करता असं? मला खरंच कळत नाही.”

arshad warsi
अभिनेता अर्शद वारसी (फोटो – इन्स्टाग्राम)

प्रभास ‘कल्की 2898 एडी’मध्ये जोकर वाटत होता, अर्शद वारसीचं स्पष्ट मत

‘कल्की 2898 एडी’च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया

“परत मागे नको जायला. आता उत्तर-दक्षिण किंवा बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असं नाही, आपण याकडे व्यापक नजरेने बघायला हवं. युनायटेड इंडियन फिल्म इंडस्ट्री. अर्शद साहेबांनी थोडे चांगले शब्द निवडायला पाहिजे होते. पण ठीक आहे, मी त्यांच्या मुलांसाठी खेळणी पाठवत आहे. तसेच मी प्रभासला ‘कल्की 2898 एडी’मध्ये सर्वोत्तम दाखवण्यासाठी कठोर मेहनत घेईन,” असं चित्रपटाचा नाग अश्विनने एक्स पोस्ट करून लिहिलं.

Story img Loader