वीकेंडचे तीन दिवस दमदार कमाई केल्यानंतर ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या कमाईला उतरती कळा लागली आहे. चित्रपटाच्या कमाईत सोमवारपासून सुरू असलेली घट अद्यापही कायम आहे. चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार चित्रपट लवकरच थिएटर्समधून गाशा गुंडाळेल, असं दिसत आहे. सहाव्या दिवसापेक्षाही सातव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईचे आकडे घटले आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांनी पूर्णपणे नाकारलं आहे.

याबरोबरच प्रेक्षकांना प्रभास हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत खटकला आहे. लोकांनी दिग्दर्शक ओम राऊतसह इतरही कलाकारांवर टीका केली आहे. प्रभासचे ‘बाहुबली’नंतर सलग चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. २०१९ साली आलेला ‘साहो’ आणि २०२२ मध्ये आलेला ‘राधे श्याम’ हे प्रभासचेदोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. ‘आदिपुरुष’च्या बाबतीतही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. ‘बाहुबली’सारखा जबरदस्त हिट देणारा प्रभास सध्या बॉक्स ऑफिसवर का अपयशी ठरत आहे याची काही कारणं जाणून घेणार आहोत.

tharala tar mag kalpana thrown out sayali from house arjun emotional breakdown
ठरलं तर मग : कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं भांडं फुटलं! सासुबाईंनी सायलीला घराबाहेर काढलं, अर्जुनला अश्रू अनावर…; पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
quantum chip Willow solves in 5 minutes
Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
Kandalvan, drone filming, flamingos, Mumbai,
मुंबई : फ्लेमिंगोच्या ड्रोन चित्रिकरणाच्या प्रकरणाची कांदळवन कक्षाची चौकशी सुरू
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
CCTV installation completed two years ago but not fully utilized in the city
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले

आणखी वाचा : “मी गोरी अन् सुंदर…” सोभिता धूलीपालाने सांगितला चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वीचा ‘तो’ अनुभव

यातील पहिलं कारण म्हणजे चित्रपटाची होणारी हवा अन् चर्चा. ‘बाहुबली’च्या छप्परफाड यशानंतर प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाची जबरदस्त हवा तयार होते अन् तो चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करत नसल्याने बॉक्स ऑफिसवर तो सपशेल आपटतो. दुसरं कारण म्हणजे चुकीच्या कथेची किंवा स्क्रिप्टची निवड. कथेच्या निवडीमध्ये प्रभास कुठेतरी चुकत असल्याने तो त्याच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीये असं बऱ्याच चित्रपट समीक्षक आणि एक्स्पर्टचं मत आहे.

तिसरं कारण म्हणजे प्रत्येक चित्रपटात होणारा व्हीएफएक्सचा अतिरेक. ‘बाहुबली’ सोडला तर प्रभासच्या ‘साहो’ अन् ‘राधे श्याम’मधील अत्यंत वाईट व्हीएफएक्समुळे त्याला प्रचंड ट्रोल केलं गेलं. ‘आदिपुरुष’लाही विरोध होण्यामागे सर्वात मोठं कारण होतं ते म्हणजे व्हीएफएक्स. चौथे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाची ‘बाहुबली’शी होणारी तुलना. प्रेक्षक असो किंवा प्रभासचे चाहते प्रत्येकालाच प्रभास म्हंटलं की ‘बाहुबली’सारखा भव्य चित्रपट डोळ्यासमोर उभा राहतो अन् आपसूकच प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. गेल्या काही वर्षात प्रभासचे चित्रपट न चालण्यामागे हे सर्वात मोठं कारण आहे.

‘आदिपुरुष’ने पहिल्या ३ दिवसांत जरी चांगली कमाई केली असली तरी नंतर मात्र चित्रपट चांगलाच आपटल्याचं दिसत आहे. त्यामुळे ‘बाहुबली’नंतर सलग तिसऱ्यांदा प्रभासने प्रेक्षकांची निराशा केल्याचं म्हंटलं जात आहे. आता प्रभासच्या आगामी ‘सलार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ या दोन्ही चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत.

Story img Loader