अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सीबीआय न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाडून हा निर्णय देण्यात आला. १० वर्षांनंतर या प्रकरणी निर्णय आला आहे. निकालानंतर सूरज आणि त्याचे कुटुंब खूप आनंदी आहे. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सुरजने सोशल मीडियावर त्याने प्रतिक्रियाही दिली.
जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी निकालानंतर सूरज पांचोलीने अधिकृत वक्तव्य जारी केले. सूरज म्हणाला “या केसमुळे त्याची १० वर्षांची झोप उडाली’. अभिनेत्याने सांगितले की, ‘आज मी फक्त एक केस जिंकली नाही तर गमावलेली प्रतिष्ठाही पुन्हा मिळवली आहे. अशा आरोपांना सामोरे जाणे कठीण होते. ही १० वर्ष मला कोण परत करेल?” असा प्रश्नही सूरजने विचारला.
आणखी वाचा : Dhoom 4 Update : ‘पठाण’च्या यशानंतर YRF च्या ‘धूम ४’बद्दल मोठी अपडेट; जॉन अब्राहम साकारणार नकारात्मक भूमिका
मानसिक शांततेपेक्षा मोठे काहीही नसल्याचे सूरजचे म्हणणे आहे. एवढंच नव्हे तर सूरज पांचोलीने नुकतंच मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. आपल्याला या संकटातून सुखरूप बाहेर काढल्याबद्दल सूरजने गणपती बाप्पाच्या मंदिरात हजेरी लावत बाप्पाचे आभार मानले आहेत. हातात गणपती बाप्पाची फोटोफ्रेम आणि खांद्यावर शाल घेऊन सुरज मंदिराबाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
२८ एप्रिल रोजी सूरज पांचोलीला सीबीआय न्यायालयाने जिया खान प्रकरणातून निर्दोष मुक्त केले. त्याच्यावर अभिनेत्रीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. ‘निशब्द’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर जिया खान दिसली होती. अभिनय कारकिर्दीच्या सुरुवातीलाच तिने आत्महत्या करून जीवन संपवलं. कोर्टाने निकाल दिला असला तरी जियाची आई त्यांच्या मुलीसाठी आणखी लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.