बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. लवकरच रणबीर आता ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे तो सध्या जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशन दरम्यान त्याने बॉलिवूडवर भाष्य केलं आहे.
बॉलिवूड कलाकार व सिनेपत्रकार यांच्यात कायमच खेळीमेळीचे वातावरण असते. मात्र कधी कधी पत्रकरांच्या प्रश्नांवर कलाकारांचा तोल जातो. नुकताच एका कार्यक्रमात रणबीर कपूरला एका पत्रकाराने बॉलिवूडबद्दल प्रश्न विचारल्यावर रणबीरने त्याचे सडेतोड उत्तर दिले. एका पत्रकाराने विचारले की “रणबीर सध्या बॉलिवूडचा सध्या वाईट टप्पा…” पत्रकाराचा प्रश्न पूर्ण न होताच रणबीरने त्याचा हजारजबाबीपणाने उत्तर दिले, “काय बोलता? पठाणचे बॉक्स ऑफिस कलेक्शन बघिततेले नाही का?” असा रिप्लाय त्याने दिला.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्याचा ‘इतक्या’ वर्षांनंतर मोठा खुलासा; म्हणाला, “शाहरुख खानमुळे…”
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या चौथ्या आठवड्यातही ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा कायम आहे. अवघ्या महिनाभरातच या चित्रपटाने जगभरात १००० कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा ‘तू झुटी मै मक्कार’ हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.