बॉलीवूड स्टार आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्याच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. दोघंही एकमेकांना डेट करतायत अशा अफवा सुरू होत्या. अशातच मार्चमध्ये त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आणि चाहत्यांना धक्का बसला.
आदित्य रॉयने गेल्याच महिन्यात अनन्याबरोबर एक जाहिरात केली होती. आता अनन्याचे वडिल चंकी पांडे यांच्याबरोबरची त्याची जाहिरात रिलीज झाली आहे. ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय.
आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या ब्रेकअपच्या अफवा सुरू असतानाच आता अनन्याचे वडिल चंकी पांडे आणि आदित्यची एक नवीन जाहिरात रीलिज झाली आहे. बिसलेरी लेमोनाटा या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये दोघं दिसले आहेत. या जाहिरातीत आदित्य समुद्रकिनाऱ्यावर बसलेला असतो तेवढ्यात चंकी पांडे येतात आणि बिसलेरी लेमोनाटा ऑफर करतात.
आदित्य रॉय कपूर आणि चंकी पांडेंच्या या जाहिरातीवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलं, “सासरा आणि जावई एकत्र, वाह” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आदित्यची सासऱ्यांबरोबर जाहिरात” एका युजरने कमेंट केली की, “मीच एकटा असा आहे का जो यात अनन्याची वाट पाहत आहे.”
गेल्या महिन्यात आदित्य आणि अनन्याने एका जाहिरातीसाठी एकत्र काम केलं होतं. पण त्यानंतर ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार असं कळलं की मार्चमध्येच अनन्या पांडे आणि आदित्य वेगळे झाले आहेत.
आदित्य आणि अनन्याच्या अफेअरबद्दल
२०२२मध्ये जेव्हा अनन्या आणि आदित्यने क्रिती सॅननच्या दिवाळी पार्टीत एकत्र हजेरी लावली तेव्हा पहिल्यांदा त्यांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. कॉफी विथ करण या शोमध्ये चित्रपट निर्माता करण जोहरेनेदेखील अनन्याच्या डेटिंगवरून तिला चिडवले होते. अनेकदा एकत्र वेकेशनसाठीदेखील ते दोघं गेले आहेत. अद्याप दोघांपैकी कोणीही ब्रेकअपबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही.
दरम्यान, आदित्य अनुराग बासू यांच्या ‘मेट्रो इन दिनों’ या चित्रपटमध्ये झळकणार आहे. या चित्रपटात सारा अली खान, अली फजल, कोंकणा सेन शर्मा, नीना गुप्ता आणि फातिमा सना शेख यांच्याही भूमिका आहेत.