आपल्या सुरेल आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या श्रेया घोषालने आजवर अनके भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तिने लहानपणासून संगीताची साधना केली असून आज ती भारतातील प्रख्यात गायिका आहे. श्रेया घोषाल सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने आपल्या आवाजाबद्दल माहिती दिली आहे.
श्रेया घोषालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटनवरून पोस्ट लिहली करत माहिती दिली की एका गाण्याच्या कॉन्सर्टनंतर तिचा आवाज गेला. मात्र वेळीच डॉक्टरांच्या मदतीने तिचा आवाज आता पूर्वीसारखा झाला आहे. तिने पोस्टमध्ये लिहलं आहे की ‘मी खूप भावुक झाले आहे. मी माझ्या बँड, टीमचे आभार मानते ज्यांनी मला कायमच पाठबळ दिल आहे. काळ रात्री ऑरलैंडो येथे झालेल्या एका कॉन्सर्टनंतर माझा आवाज गेला होता. डॉक्टर माझे आप्तस्वकीय आणि चाहत्यांमुळे तो आता पूर्वीसारखा झाला.’ त्यानंतर मी न्यूयॉर्कममध्ये झालेल्या कॉन्सर्टमध्ये गाऊ शकले. तिचा अमेरिकेचा दौरा संपला आहे असे तिने जाहीर केले आहे.
तिच्याबरोबर घडलेल्या या घटनेमुळे तिचे चाहतेदेखील तिच्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र आता तिची तब्येत ठीक असल्याने चाहत्यांनीदेखील आनंदाचे वातावरण आहे. तिचा आवाज आता पहिल्यासारखा झाला आहे. मात्र कोणत्याही कलाकाराच्या त्यातही गायकांच्या बाबतीत हा प्रसंग ओढवणे हे धक्कदायक आहे.
श्रेयाने अगदी लहानपणापासून गायन क्षेत्रात करियर करण्यास सुरवात केली होती. तिने लहानपणी झी सा रे ग म प कार्यक्रमात भाग घेतला. त्या कार्यक्रमात ती विजेती ठरली होती. वयाच्या ६ वर्षी तिने शास्त्रीय गाण्याचे शिक्षण घेण्यास सुरवात केली होती. आज तिने अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. श्रेया मूळची बंगालची असून राजस्थान मधील कोटा शहराजवळील एका गावात तिचे बालपण गेले आहे.