‘गदर २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दमदार कमाई केली आहे. चित्रपटाच्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. अवघ्या सहा दिवसात २५० कोटींचा टप्पा गाठणाऱ्या ‘गदर २’ ने सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी ‘गदर २’ने ३०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सनी देओलच्या चाहत्यांनी तर बॉक्स ऑफिसवर प्रचंड गर्दी केली आहे.

एकूणच सध्या जुन्या चित्रपटांचे रिमेक बॉक्स ऑफिसवर चांगलेच हिट होत आहेत, हे पाहून बरेच जुने निर्माते आणि दिग्दर्शक यासाठी उत्सुक आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ‘गदर २’ च्या घवघवीत यशानंतर सनी देओलच्या आणखी एका चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा सुरू झाली आहे.

Sanam Teri Kasam Re Release Box office day 2 crossed the lifetime collection of original
२०१६मध्ये फ्लॉप झालेल्या ‘सनम तेरी कसम’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; दोन दिवसांत मोडला जुना रेकॉर्ड
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Tharla Tar Mag Time Slot Change
‘ठरलं तर मग’ मालिकेची वेळ बदलली! ‘स्टार प्रवाह’वर १० फेब्रुवारीपासून होतील ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या…
Paaru
Video: लग्नातून गायब झालेला हरीश मालिकेत पुन्हा परतणार; पारूचे सत्य सर्वांसमोर येणार का?
suraj chavan
ठरलं! सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपूक’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
OTT Release In February first week
या वीकेंडला ओटीटीवर काय पाहायचं? वाचा वेब सीरिज व चित्रपटांची यादी!
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Maharashtrachi Hasya Jatra nikki tamboli
“मी कोकणात शिमग्याला जातेय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये भन्नाट स्किट सादर करणार निक्की तांबोळी, समोर आला प्रोमो

आणखी वाचा : “आमच्यासाठी चाहत्यांचं प्रेमच…” चित्रपटसृष्टीतील राजकारणाविषयी धर्मेंद्र यांनी व्यक्त केली नाराजी

अभिनेता सनी देओल, दिग्दर्शक जे.पी.दत्ता आणि निधी दत्ता यांच्यात सध्या ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या सीक्वलची म्हणजेच ‘बॉर्डर २’बद्दल चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. ‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार लवकरच यावार काम सुरू होण्याची शक्यता आहे. खात्रीशीर सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “गेल्या २ ते ३ वर्षांपासून ‘बॉर्डर’चा सीक्वल करायचा विचार सुरू होता ज्यावर आता कुठे शिक्कामोर्तब होत आहे. लवकरच यावर काम करणारी टीम या सीक्वलची घोषणा करेल.”

अभिनयाबरोबरच या चित्रपटाच्या निर्मितीतही सनी देओल सहभाग घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. ‘बॉर्डर’ हा १९९७ चा एक सुपरहीट वॉर ड्रामा चित्रपट होता. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर बेतला होता. प्रेक्षकांनी त्यावेळी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला होता. यात सनी देओल, सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, जॅकी श्रॉफ, पुनीत इस्सर, पूजा भट्ट, तब्बू, राखी असे मातब्बर कलाकार होते.

Story img Loader