दिवंगत गायिका लता मंगेशकर यांना भारताची गानकोकिळा म्हणून ओळखले जायचे. आज त्यांचा जन्मदिवस. २८ सप्टेंबर १९२९ मध्ये जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी आठ दशकांच्या कारकिर्दीत ३६ हून अधिक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली आहेत. महत्त्वाचे म्हणजे काही विदेशी भाषांमधील गाण्यांनादेखील त्यांनी आपला आवाज दिला आहे.

विशेषत: हिंदी आणि मराठीमधील त्यांची अनेक गाणी गाजली. १९४९ ला प्रदर्शित झालेल्या ‘महल’ चित्रपटापासून ते २००६ मधील ‘रंग दे बसंती’च्या चित्रपटातील त्यांची गाणी चाहत्यांना आजही भुरळ घालतात. आज तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली असून सर्वच क्षेत्रांत त्याचा फायदा होताना दिसतो. मात्र, ४०-५० च्या दशकात प्रगतशील तंत्रज्ञानाच्या अभावामुळे कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत असे, याचा खुलासा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत केला होता.

Priyanka Gandhi
Priyanka Gandhi : “जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या होत्या”, प्रियांका गांधींची वायनाडमध्ये मतदारांना भावनिक साद
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Sujay Vikhe Patil Emotional Speeh
Sujay Vikhe Patil : भरसभेत सुजय विखेंना अश्रू अनावर; म्हणाले, “सातत्याने मला संपवण्याचा प्रयत्न होतोय!”
Shraddha Kapoor
Video: श्रद्धा कपूरच्या साधेपणाने जिंकले मन; अभिनेत्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले, “तिच्या संस्कारातून…”
BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप
dr tara bhawalkar honored with loksatta durga lifetime achievement award
माणसातील जनावर अजूनही जिवंत आहे; डॉ. तारा भवाळकर यांची स्पष्टोक्ती ;‘ लोकसत्ता दुर्गां’चा गौरव सोहळा
Zeeshan Siddique Emotional Post
Zeeshan Siddique : “बाबा मला तुमची रोज आठवण…”; झिशान सिद्दिकींची बाबा सिद्दिकींबाबत भावूक पोस्ट

“…म्हणून ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं आजही लक्षात आहे”

‘सीएनएन आयबीएन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणे आवडते असल्याचे म्हटले होते. त्याचे कारण सांगताना लता मंगेशकर यांनी म्हटले होते, “हे गाणे रेकॉर्ड करणे सर्वात जास्त आव्हानात्मक होते. जेव्हा पहिले कडवे मी रेकॉर्ड केले, त्यावेळी मला त्यांनी सांगितले की, आवाज दूरवरून येतोय असे वाटले पाहिजे; त्यावेळी आतासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते, त्यामुळे मी माइकपासून थोडी लांब उभी राहत असे. मला सांगितले गेले की चालत-चालत गायचे आहे आणि जेव्हा ‘आयेगा’ हा शब्द येईल, त्यावेळी मी माइकजवळ असायला पाहिजे. असे मी २५ वेळा केले. प्रत्येकवेळी त्यांना काहीतरी कमतरता वाटत असे आणि ते मला पूर्ण कडवे पुन्हा गाण्याची विनंती करत असत. मी थोडी घाबरले होते. चालत-चालत गाणे रेकॉर्ड करणे आणि ‘आयेगा’ या शब्दावेळी बरोबर माइकजवळ पोहचणे मला जरा अवघड वाटत होते. मी ते करू शकत नव्हते. मात्र, शेवटी ते जमले. त्यामुळेच मला वाटते की आजही मला ते गाणे लक्षात आहे”, अशी आठवण लता मंगेशकर यांनी सांगितली होती.

‘मुग़ल-ए-आज़म’ या चित्रपटातील ‘प्यार किया तो डरना क्या’ हे लोकप्रिय गाणे इको इफेक्ट येण्यासाठी लताजींनी बाथरुममध्ये रेकॉर्ड केले होते असे म्हटले जायचे. यावर खुलासा करताना त्यांनी याच मुलाखतीत सांगितले होते, “नाही, मी हे गाणे बाथरुममध्ये रेकॉर्ड केले नव्हते. जेव्हा हे गाणे रेकॉर्ड केले तेव्हा त्यांना यातील शेवटची ओळ आवाज घुमणारी (इको) पाहिजे होती. पण, त्यावेळी आतासारखे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. तर नौशादने मला दुसऱ्या रुममध्ये जाऊन गायला सांगितले, त्यानंतर पुन्हा माइकजवळ येऊन गायले. अशा प्रकारे मी वेगवेगळ्या जागेवरून हे गाणे गायले. पण, बाथरूममधून गाणे रेकॉर्ड केल्याची गोष्ट खरी नाही”, असा खुलासा त्यांनी केला होता.

तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू झालेले भावूक

‘सीएनएन आयबीएन’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी एक आठवण सांगितली होती. त्यांनी म्हटले होते, “भारत-चीन युद्धामध्ये अनेक सैनिकांनी प्राण गमावले होते, त्यामुळे सगळीकडे अस्वस्थता होती. त्यानंतर काही दिवसांतच १९६३ च्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात मी गाणे गायले होते. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि इतर मंत्रीही तिथे उपस्थित होते. मी त्यावेळी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गाणे गायले होते. ते त्यांना इतके आवडेल याची मला कल्पना नव्हती. मी गाणे संपवून आत आले तेव्हा आमचे डायरेक्टर मेहबूब खान मला शोधत होते. मला पाहताक्षणी ते म्हणाले, चल, तुला पंतप्रधान बोलवत आहेत. मी का असं विचारत होते, तोपर्यंत त्यांनी मला पंतप्रधानांसमोर उभे केले. पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मला बघितल्यावर, “बाळा, आज तू मला रडवलं”, असे म्हटले आणि ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी माझ्या बहिणीचे लग्न असल्याने मी मुंबईला परतले, तोपर्यंत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. ‘दीदींनी पीएमला रडवलं’ अशा ठळक बातम्या वाचायला मिळाल्या”, अशी आठवण त्यांनी सांगितली होती.

“आठ-दहा तास उभे राहून ‘लुका छुपी’ गाणे रेकॉर्ड केले”

चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलताना एका मुलाखतीत सांगितले होते, “ए. आर. रेहमान यांनी कम्पोज केलेले ‘लुका छुपी’ हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी त्या चेन्नईला गेल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे गाणे ८-१० तास उभे राहून रेकॉर्ड केले होते.”

हेही वाचा: “७५ वर्षांची आपली लोकशाही जे देऊ शकली नाही ते…”, मराठी अभिनेत्याची सूरज चव्हाणसाठी पोस्ट; म्हणाला…

लता मंगेशकर यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ‘भारतरत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. फ्रान्स सरकारने २००७ मध्ये त्यांना ‘द लीजन ऑफ ऑनर’ या फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारने सन्मानित केले होते. फिल्मफेअर आणि सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

आज दिवंगत गायिका लता मंगशेकर यांची ९४ वी जयंती आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी ६ फेब्रुवारी २०२२ ला त्यांचे निधन झाले.