गेल्या अनेक दिवसांपासून के.एल.राहुल व अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर ते २३ जानेवारी म्हणजे आज विवाहबंधनात अडकले आहेत. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसवर अथिया व राहुलचा शाही विवाहसोहळा पार पडला. नातेवाईक व कुटुंबियांच्या उपस्थितीत अथिया व राहुलने लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अथिया व के.एल.राहुलच्या लग्नाची बातमी सुनील शेट्टीने प्रसारमाध्यमांना दिली आहे. त्यांच्या लग्नानंतर सुनील शेट्टीने मुलगा अहान शेट्टीबरोबर पापाराझींना प्रतिक्रिया दिली. तो असं म्हणाला, “मी खुश आहे राहुल मला नेहमीच माझ्या भावासारखा आहे, मला खूप आनंद होतो आहे की तो आता तो आमच्या कुटुंबाचा भाग बनला आहे,” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रया दिली आहे.

सुनील शेट्टीची लेक आता होणार केएल राहुलची पत्नी; तिच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

लग्नानंतर सुनील शेट्टी व अहान शेट्टीने पापाराझींना फोटोसाठी पोझ दिल्या. सुनील शेट्टीने पापाराझींना मिठाई वाटत त्यांचे आभार मानले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेकीच्या लग्नात सुनील शेट्टीने खास लुंगी व सदरा असा पेहराव केला होता. अथिया व के.एल.राहुलच्या लग्नातील सुनील शेट्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

के.एल.राहुल व अथिया शेट्टी गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लग्नगाठ बांधत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After kl rahul athiya shetty wedding brother ahaan shetty gives reaction on kl rahul spg