कियारा अडवाणी व सिद्धार्थ मल्होत्रा ७ फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकले. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला. लग्नानंतर त्यांनी आता नवीन घर घेतलं आहे. नव्या घरात गृहप्रवेश केल्यानंतर आता सिद्धार्थ कमला लागला आहे.
७ तारखेला विवाह सोहळा रंगला नंतर ही सगळी मंडळी दिल्लीला सिद्धार्थच्या घरी आली. तिथे कियाराचा गृहप्रवेश झाला. तर तिथे त्यांनी एक रिसेप्शनही ठेवलं होतं. तो सगळा कार्यक्रम उरकून आता ते मुंबईत आले आहेत. रविवारी मुंबईत त्यांच्या लग्नाचा रिसेप्शन झालं. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. आता सिद्धार्थाचा नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्याबरोबर शशांक खैतानदेखील दिसत आहे. नुकताच तो धर्मा प्रॉडक्शनच्या ऑफिसबाहेर दिसला.
अक्षय कुमार, इम्रान हाश्मीचा चाहत्यांना सुखद धक्का; प्रमोशनसाठी चक्क मुंबई मेट्रोने प्रवास
समोर आलेल्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले की, ‘लग्नाची चमक सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे’. दुसऱ्याने लिहिले, ‘सिद्धार्थ तू दिवसेंदिवस तरुण होत आहेस.’ दोघेही सदैव आनंदी राहोत’ अशी एकाने प्रतिक्रिया दिली आहे.
सिद्धार्थ नुकताच मिशन मजनू चित्रपटात झळकला होता, हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आता सिद्धार्थ योद्धा या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तो रोहित शेट्टीच्या आगामी वेबसीरिजमध्येदेखील झळकणार आहे.