गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला १०० वर्षे जुना झुलता पूल काल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३२ अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही भीषण घटना घडली. या दुःखद घटनेनंतर बॉलिवूडकरांनी सोशल मीडियाद्वारे दुःख व्यक्त केलं आहे. त्याचबरोबरीने आता नेटकरी इरफान खानच्या ‘मदारी’ चित्रपटातला एक सीन सध्या व्हायरल करत आहेत.

या सीनमध्ये असं दाखवण्यात आले आहे की चित्रपटातील अभिनेता इरफान खानने साकारलेल्या पात्राचा मुलगा पुलाखाली दबल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. या चित्रपटात तो एका सामान्य माणसाच्या भूमिकेत आहे. मुलाच्या मृत्यूसाठी तो सत्तेतील नेत्यांना जबाबदार धरतो. इरफानचे पात्र बदला घेण्यासाठी गृहमंत्र्यांचे (चित्रपटात) अपहरण करते. ज्यांच्यामुळे आपला मुलगा तसेच इतर नागरिकांचा नाहक बळी गेला अशा व्यक्तींना शिक्षा देण्याचे काम इरफान खानने साकारलेले पात्र ठरवते.

Photos : कामातून ब्रेक घेत मराठमोळी अभिनेत्री श्वेता शिंदे पोहचली ‘या’ देशात! सोशल मीडियावर फोटो व्हायरल

‘मदारी’ चित्रपटाचा हा सीन लोक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. या चित्रपटात सत्ताधारी लोक आणि सामान्य माणूस यांच्यातील संघर्ष दाखवला आहे. इरफान खानने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. मराठमोळा दिग्दर्शक निशिकांत कामत याने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. निशिकांतने डोंबिवली फास्टसारखा चित्रपटदेखील दिग्दर्शित केला होता.

या घटनेनंतर मृतांच्या नातलगांना पंतप्रधान राष्ट्रीय साहाय्यता निधीमधून दोन लाखांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. तर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनीही मृतांच्या नातलगांना चार लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

Story img Loader