२०२३ हे वर्षं शाहरुख खानसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलं. आधी ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’ या दोन्ही शाहरुख खानच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसव जवळपास १००० कोटींहून अधिक कमाई केली. शाहरुखचा ‘जवान’ त्याच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. ‘जवान’ हा नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपटही ठरला.

या चित्रपटाबद्दल सगळं काही चांगलंच कानावर पडत असताना आता काही नकारात्मक गोष्टीदेखील समोर येऊ लागल्या आहेत. ‘जवान’मध्ये साऊथची ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराच्या भूमिकेची लांबी कमी केल्याची भरपुर चर्चा होती. इतकंच नव्हे तिची भूमिका चित्रपटाला साजेशी नसल्याने तिच्या भूमिकेची लांबी कमी केल्याचं कारणही देण्यात आलं होतं. यामुळेच ‘जवान’च्या प्रमोशन आणि मार्केटिंगमध्ये कुठेच नयनतारा सहभागी नसल्याचं स्पष्ट झालं. तिने या प्रमोशनचा बॉयकॉट केल्याचीही चर्चा होती.

Soybean Price, Vidarbha, Ladki Bahin Yojana,
विरोधकांचे ‘सोयाबीन अस्त्र’ ‘लाडक्या बहीण’चा प्रभाव रोखणार ?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
tasgaon kavathe mahankal assembly constituency rohit patil vs sanjay kaka patil maharashtra assembly elections 2024
लक्षवेधी लढत : दोन पाटलांमधील लढतीत कोणाची बाजी?
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Action against those who lure voters in Malegaon
मतदारांना प्रलोभन देणाऱ्या विरोधात मालेगावात कारवाई

आणखी वाचा : अब्बास-मस्तान यांना सर्वप्रथम दीपक तिजोरीने ऐकवलेली ‘बाजीगर’ची कथा; शाहरुखला मुख्य भूमिकेत पाहून अभिनेता म्हणाला…

आता नयनताराच्या पाठोपाठ या चित्रपटातील मुख्य खलनायकाच्या भूमिकेत काम करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीच्या बाबतीतही अशाच गोष्टी ऐकायला मिळत आहेत. चित्रपटासाठी विजयने केलेलं शूटिंग आणि लोकांसमोर सादर करण्यात आलेला चित्रपट यात फार तफावत असल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार स्पष्ट होत आहे. चित्रपटातील विजय सेतुपतीचे बरेच सीन्स वगळण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजयला हे माहीत असूनही त्याने शाहरुखच्या बरोबरीनेच या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सहभाग घेतला.

‘टाइम्स नाऊ’ला एका सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, “चित्रपटातील विजयचे बरेचसे सीन्स वगळण्यात आले, जेव्हा विजयने स्वतः हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यालासुद्धा धक्काच बसला. परंतु त्याने यावर भाष्य करायचं टाळलं. शाहरुख खानबरोबर काम करून त्याला फार मजा आली, त्याच्यामते ‘जवान’मध्ये शाहरुखसह काम करण्याचा अनुभवच त्याच्यासाठी मोलाचा आहे. आजवरच्या संपूर्ण कारकिर्दीत विजयच्या बाबतीत असं प्रथमच घडलेलं आहे.” विजय सेतुपती लवकरच श्रीराम राघवन यांचा आगामी ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विजयसह कतरिना कैफही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.