बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित झाला. महिना उलटून गेला तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. चित्रपटाने बाहुबली चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. शाहरुखने तब्बल ४ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. चाहत्यांनीदेखील त्याचे स्वागत केलं आहे. शाहरुखने खास चाहत्यांचे आभार मानले आहेत.
शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रीय आहे. चित्रपटाबद्दल त्याने सातत्याने अपडेट चाहत्यांना दिले आहेत. नुकतीच त्याने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. “हा व्यवसाय नाही, हे वैयक्तिक आहे. लोकांचे मनोरंजन करणे हा आमच्या व्यवसाय आहे आणि जर ते आम्ही वैयक्तिकरित्या घेतले नाही तर आम्ही मोठी झेप घेऊ शकत नाही. पठाणला दिलेल्या प्रेमाबद्दल तसेच या चित्रपटात काम केलेल्या सगळ्यांना धन्यवाद. मेहनत, सातत्य आणि विश्वास या गोष्टी अजून जिवंत आहेत. जय हिंद” अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.
‘पठाण’ आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ चित्रपट २८ एप्रिल २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटींची कमाई केली होती.
शाहरुख खानच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख आणि जॉनने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टमध्ये डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांसारख्या उत्कृष्ट कलाकारांचा समावेश आहे. सलमान खानने या चित्रपटात टायगरच्या रोलमध्ये कॅमिओ केला होत.