सलमान खानचा मल्टिस्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडली आहे. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला तरी अद्याप चित्रपटाला भारतात १०० कोटींचा गल्ला जमवता आला नाही. मात्र, जगभरात चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे. यामुळेच आता सलमान खानने एक मोठा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुढील वर्षी ईदला सलमान खानकडून त्यांच्या चाहत्यांना खास सरप्राईज मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘ट्यूबलाइट’पासून ‘राधे’पर्यंत सलमानचे सध्या ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट फारसे चाललेले नाहीत. शिवाय नुकताच आलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू न शकल्याने पुढील चित्रपटांच्या बाबतीत सलमान खान विचार करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री…
Marathi actress Mukta Barve special post after appearing in Indrayani serial
‘इंद्रायणी’ मालिकेत झळकल्यानंतर मुक्ता बर्वेची खास पोस्ट, म्हणाली, “कितीतरी दिवसांनी…”
raja hindustani budget and box office collection
फक्त ६ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले ७६ कोटी, तुम्ही पाहिलाय का २८ वर्षांपूर्वीचा ‘हा’ सुपरहिट चित्रपट?
Muramba
Video: “ज्या हातांनी मंगळसूत्र फेकलंस…”, रमा रेवाला देणार सणसणीत उत्तर; ‘मुरांबा’चा जबरदस्त प्रोमो
ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड

आणखी वाचा : Ponniyin Selvan 2 box Office Collection: अवघ्या ४ दिवसांत ‘PS 2’ने पार केला २०० कोटींचा टप्पा, कमावले ‘इतके’ कोटी

एका न्यूज पोर्टलनुसार सलमान खानला तब्बल ६ चित्रपट ऑफर झाले आहेत. आता नवीन चित्रपट करण्यास मात्र सलमान तयार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ हा नोव्हेंबरला येणार असून त्यासाठी सलमानने हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सलमानच्या पुढील चित्रपटांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या ‘टायगर ३’ या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढे कोणत्या चित्रपटांना होकार द्यायचा असा निर्णय सलमानने घेतल्याची चर्चा सुरू आहे. २०२४ च्या ईदला सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नसेल ही गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक असेल. सलमानच्या ‘टायगर ३’ची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. याचं दिग्दर्शन मनीष शर्माने केलं असून शाहरुख खान यात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.