दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाचा मार्फ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सिनेविश्वात एकच खळबळ उडाली. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकार व चाहत्यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली. या घटनेला एक दिवस उलटत नाही तोपर्यंत बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफचाही डीपफेक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याची माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “… तर ते आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतं” रश्मिकाच्या डीपफेक व्हायरल व्हिडीओवर मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली….

कतरिना कैफ लवकरच ‘टायगर ३’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील एका सीनमध्ये कतरिनाने टॉवेल गुंडाळून फायटिंग केला आहे. कतरिनाचा हा टॉवेल सीन ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ट्रेलरमधील कतरिनाच्या मूळ फोटोशी छेडछाड करत यात बदल करण्यात आला आहे. एका युजरने एक्सवर (ट्विटर) कतरिनाचा हा आक्षेपार्ह फोटो शेअर केला होता. हा डीफफेक फोटो आता सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून हटवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून अभिनेत्रीच्या मूळ फोटोमध्ये मोठ्या प्रमाणात छेडछाड करण्यात आली होती.

हेही वाचा : “प्रचंड हाल सोसले…”, आजीच्या निधनानंतर ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची भावुक पोस्ट; म्हणाली, “तिचे प्रेम…”

रश्मिका पाठोपाठ कतरिना कैफचा डीपफेक फोटो व्हायरल झाल्याने अनेकांकडून या नव्या तंत्रज्ञानाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कतरिनाच्या आधी सोमवारी रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो किंवा आवाजाची हुबेहूब नक्कल करणारे व्हिडीओ तयार करण्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होऊ लागला आहे.

कतरिनाचे डीपफेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी सायबर क्राईमकडून यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी देखील केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After rashmika mandanna katrina kaif towel scene from tiger 3 gets morphed using deepfake sva 00