बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही नेहमी फार बिनधास्तपणे तिचे मत व्यक्त करताना दिसते. ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रोफेशनल करिअर याबद्दल कायमच स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नुकतेच तिने पापाराझींवर भाष्य केलं आहे.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे हे लाडकं जोडपं एका पार्टीमधून घरी परतले होते तेव्हा काही पापाराझी त्यांच्या घराबाहेर उभे होते. त्यावेळी सैफ अली खान पापाराझींवर भडकला होता. त्यावरच आता करीना कपूरने भाष्य केलं आहे. ती असं म्हणाली “मी कोणतीही सीमारेषा आखत नाही आणि जेव्हा ते आमचे फोटो क्लिक करतात तेव्हा काही हरकत नाही. मला असं कधी कधी वाटतं मी काय करू शकते त्यांच्यासाठी मी फक्त त्यांना विनंती करते की इमारतीच्या आवारात आल्यावर किंवा मुलं खेळत असताना फोटो काढू नका.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
“त्यांना काम आवडले पण…” वेबसीरिजसाठी नकार मिळाल्याने सुप्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
पापाराझी व बॉलिवूडचे कलाकार यांच्यात कायमच वाद होताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी आलिया भट्टचे काही खासगी फोटो व्हायरल करण्यात आले होते. त्यावरून बॉलिवूड कलाकारांनी संताप व्यक्त केला होता.
दरम्यान करीना ही लवकरच ओटीटी या माध्यमावर झळकणार आहे. सुजॉय घोषच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित थ्रिलर चित्रपटातून ती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. त्याबरोबरच ती हंसल मेहता यांच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.